horoscope

रविवार 2 सप्टेंबर : आजचा दिवस या 3 राशीसाठी राहील आनंदमय, तर इतरांसाठी सामान्य

आज रविवार 2 सप्टेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Sunday, September 02, 2018)

तुमचे आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घ काळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरेल. अतिशय व्यस्त असूनही तुम्ही आरोग्य चांगले राखल्यामुळे थकवा येणार नाही. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखदायक असेल. तुमच्या रोमॅण्टिक जोडीदाराशी फोनवर बराच काळ न बोलून तुम्ही जोडीदाराला छळाल. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. वीज खंडीत झाल्यामुळे किंवा इतर कोणत्यातरी कारणामुळे सकाळी तयार होण्यास उशीर होईल, पण तुमचा/तुमची जोडीदार तुमच्या मदतीला येईल.

वृषभ राशी भविष्य (Sunday, September 02, 2018)

अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. कधी तुम्ही चॉकलेट, आलं आणि गुलाबाचा एकत्र सुवास घेतला आहे? तुमच्या प्रेमाची चव आज तशीच काहीशी असणार आहे. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. अलीकडच्या काही दिवसात तुमचे आयुष्य खडतर होते, पण आता तुमच्या जोडीदारासमवेत तुम्हाला स्वर्गीय सुख मिळणार आहे.

मिथुन राशी भविष्य (Sunday, September 02, 2018)

स्वत:मध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होईल – तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. मुलांकडून एखादी थरारक बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रेमच प्रेम चोहीकडे, अशी तुमची स्थिती आहे. आजुबाजूला बघा, वातावरण गुलाबी आहे. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसणाºया लोकांसोबत जाण्यास विरोध करा. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस हा अत्यंत रोमँटिक असणार आहे.

कर्क राशी भविष्य (Sunday, September 02, 2018)

रक्तदाबाचा विकार असणा-यांनी खचाखच भरलेल्या बसमधून प्रवास करताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल. मुलांना त्यांचा गृहपाठ पूर्ण करण्यासाठी मदत करा. त्यासाठी वेळ काढा. तुमचे अनियंत्रित चंचल वागणे यामुळे प्रिय व्यक्तीसोबत तुमचे मतभेद होतील. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील मजा निघून गेली आहे, असे तुम्हाला वाटेल, पण लवकरच सगळं काही ठीक होईल.

सिंह राशी भविष्य (Sunday, September 02, 2018)

तुम्हाला आज थोडे अस्वस्थ वाटेल – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या धावपळीमुळे तुम्ही थकून जाल. तुमच्याजवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. त्यामुळे येणा-या काळात तुम्हाला त्याचा लाभ होईल. काही लोक तुमच्यासाठी गंभीर परिस्थिती निर्माण करतील परंतु तुम्ही त्यांच्याकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या वागण्यामुळे तुम्ही संवेदनशील बनाल – तुमचा राग अनावर होऊ देऊ नका आणि कोणतेही बेजबाबदार कृत्य करू नका ज्यामुळे आयुष्यभर तुम्ही स्वत:लाच दोष देत राहाल. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील मजा निघून गेली आहे, असे तुम्हाला वाटेल, पण लवकरच सगळं काही ठीक होईल.

कन्या राशी भविष्य (Sunday, September 02, 2018)

उघडयावरचे अन्नसेवन करताना विशेष काळजी घ्या. परंतु उगाचच तणाव घेऊ नका नाहीतर तुमचा मानसिक तणाव वाढेल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. घरासभोवतालचे किरकोळ बदल घराकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतील. रोमॅण्टीक घटनांमध्ये बदल होण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्या स्वत:साठी चांगले कपडे घ्याल. तुमच्या जोडीदाराशी कोणत्याही बाबतीत तक्रार करू नका. आज तिचा/त्याचा मूड ठीक नाही. तक्रार केल्याने परिस्थिती अजूनच बिघण्याची शक्यता आहे.

तुल राशी भविष्य (Sunday, September 02, 2018)

संयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद, मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च वाढता असेल. आजच्या दिवशी तुम्ही काय करावे आणि काय करू नये हे कुटुंबियांना ठरवू देऊ नका. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकमेकांच्या बाहुपाशात गुरफटून जाण्यासाठी आज भरपूर वेळ मिळणार आहे.

वृश्चिक राशी भविष्य (Sunday, September 02, 2018)

असुरक्षितता अथवा आत्मविस्मृतीच्या भावनेमुळे चक्कर येईल. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. मित्रांकडून तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला अधिक आधार मिळू शकेल. आपल्या जीवनसाथीचा मूड फारसा चांगला वाटत नाही, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक सर्व गोष्टी हाताळा. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. शेजाऱ्यांकडून ऐकलेल्या एखाद्या गोष्टीवरून तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल.

धनु राशी भविष्य (Sunday, September 02, 2018)

तुमच्या पुढे जाण्यासाठी कुणीतरी तुमचा मूड बिघडविण्याचा प्रयत्न करेल परंतु तुम्हाला त्रास देण्याचा हा प्रयत्न तुम्ही यशस्वी होऊ देऊ नका. या सगळ्या फुकाच्या चिंता आणि काळज्या यामुळे तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि कदाचित त्वचाविषयक समस्या उद्भवेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा – आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. तुम्हाला निवांत आरामाची गरज आहे आणि जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्यांमध्ये राहून आनंदाचा काळ घालवा. प्रणयराधन करण्याच्या आठवणींनी तुमचा दिवस व्यापून राहील. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. क्षुल्लक वाद विसरू जेव्हा तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याजवळ येईल आणि तुम्हाला मिठी मारेल तेव्हा आयुष्य खूपच सुंदर होणार आहे.

मकर राशी भविष्य (Sunday, September 02, 2018)

आज तुम्हाला खूप थकल्यासारखे जाणवेल आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून तुम्ही खूप वैतागण्याची शक्यता आहे. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. आपल्या प्रिय व्यक्तीच्या मूडमधील बदल आज अनेक हेलकावे खाणारा असेल. आज अनेक असे विषय, प्रश्न उद्भवतील – ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. तुमच्या जोडीदाराशी झालेल्या वादामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यातील बंध सैल झाले आहेत, असे तुम्हाला वाटू शकेल.

कुम्भ राशी भविष्य (Sunday, September 02, 2018)

तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु, सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये आज कुणीतरी बिब्बा घालेल. तुम्ही अवचित काही चुकीचे बोलाल किंवा कृती कराल तर अधिकारी व्यक्ती तुम्हाला समजून घेणार नाहीत. तुमच्या इतर कुटुंबियांमुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होईल, पण तुम्ही दोघेही ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळाल.

मीन राशी भविष्य (Sunday, September 02, 2018)

कामकाजाच्या ठिकाणच्या तणावामुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता आहे. मालमत्ताविषयक कामे होतील आणि उत्तमपैकी नफा होईल. घरगुती कामाचा पसारा, ताण कमी करण्यासाठी आपल्या पत्नीला मदत करा. त्यामुळे सुख तर वाढेलच, पण सहजीवनाची अनुभुतीदेखील जाणवेल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या बाहुपाशात तुम्हाला सुखकारक वाटेल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने आजचा दिवस खूपच चांगला आहे.


Show More

Related Articles

Back to top button