horoscope

रविवार 02 डिसेंबर : सूर्यांनी बदलली चाल तीन राशींचे दूर होणार कष्ट, एक राशीवर येणार संकट

आज रविवार 02 डिसेंबर चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Sunday, December 02, 2018)

इतरांविषयी शेरेबाजी करताना किंवा गृहितके ठरविताना त्यांच्या भावना समजून घ्या. तुमच्याकडून घेतलेला एखादा चुकीचा निर्णय संबंधितांवर विपरीत परिणाम करण्याबरोबरच तुम्हाला मानसिक तणावात टाकणारा ठरेल. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. क्वचित भेटीगाठी होणाºया लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही, तुमचे हृदय धडधडेल. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करु नका. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल.

वृषभ राशी भविष्य (Sunday, December 02, 2018)

तुमच्या अविचारी वागण्यामुळे बायकोशी तुमचे संबंध बिघडतील. कुठलाही मूर्खपणा करण्यापूर्वी तुमच्या वागणुकीच्या परिणामांबद्दल विचार करा. शक्य असेल तर तुमचा मूड बदलण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील – कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या-वाईट बाबी तपासून पाहा. पाहुण्यांना भेटण्यात संध्याकाळ व्यतीत होईल. तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल, तुम्ही भारावून जाल. तुमची बलस्थाने कोणकोणती आहे याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. गेल्या काही दिवसांच्या अबोल्यानंतर तुम्ही आणि तुमचा/तुमची जोडीदार पुन्हा एकदा एकमेकांच्या प्रेमात पडला.

मिथुन राशी भविष्य (Sunday, December 02, 2018)

तुमच्या भांडखोर वागणुकीमुळे तुमचे शत्रू वाढतील. तुम्ही रागावाल असे वर्तन कुणी केले तरी तुम्ही तुम्ही रागावू नका. कारण कदाचित त्याचा तुम्हाला नजिकच्या भव्यिात पश्चात्ताप करावा लागेल. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. आपल्या कुटुंबियांशी कठोरपणे वागू नका, शांततेला मारक ठरू शकते. आजच्या दिवशी प्रेमात पडल्यामुळे एखाद्या पवित्र घटनेचा अनादर ठरु शकतो, त्यामुळे काळजी घ्या. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर संशय घेईल. पण दिवसाच्या शेवटी मात्र तो/ती समजून घेईल आणि तुम्हाला मिठीत घेईल.

कर्क राशी भविष्य (Sunday, December 02, 2018)

चांगल्या प्रकृतीमुळे तुम्ही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ शकाल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल. जर तुम्ही आज प्रेम करण्याची संधी वाया दवडली नाहीत तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणे पाहायला मिळतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट होईल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी खास खरेदी करेल.

सिंह राशी भविष्य (Sunday, December 02, 2018)

लहान मुलांबरोबर खेळण्यातून मौज मस्ती करणे हा आपल्या दुखावर चांगला उपाय असेल. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. समूह कार्यात सहभागी झालात तर नवीन मित्र भेटतील. आज तुमचे प्रियजन तुमच्या विचित्र, त्रासदायक वागण्यामुळे अडचणीत सापडतील. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुम्ही किंवा तुमचा जोडीदार आज शृंगार करताना दुखावले जाल. तेव्हा हळुवारपणा बाळगा.

कन्या राशी भविष्य (Sunday, December 02, 2018)

तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. कामाचा डोंगर असला तरी प्रणयराधन आणि मित्रमंडळींमध्ये मिसळणे याचाच अंमल तुमच्या मनावर राहील. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्याा स्पर्धेत यश मिळवून देईल. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल.

तुल राशी भविष्य (Sunday, December 02, 2018)

हृदयरोग असणाºयांनी कॉफी सोडण्याची तातडीची गरज आहे. यापुढेही असेच कॉफी घेत राहिलात तर आपल्या हृदयावर अनावश्यक दडपण येईल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. मित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल. सुट्टीची योजनादेखील तयार कराल. प्रणयराधन करणे अतिशय उत्साहाचे ठरेल – म्हणून लगेच तुमच्या प्रिय व्यक्तीशी संपर्क साधा आणि दिवसभर उत्साहात घालवाल. आज तुम्ही स्वत:ची परीक्षा पाहाल – तुमच्यापैकी काही जण बुद्धिबळ खेळतील – कोडी सोडवतील आणि अन्य काहीजण कथा-कविता लेखन करतील किंवा भविष्यातील काही योजनांचे बेत आखतील. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता, हे व्यक्त करा.

वृश्चिक राशी भविष्य (Sunday, December 02, 2018)

वैरभाव महागात पडू शकतो. त्यामुळे आपल्या सहिष्णूतेला, उदार स्वभावाला सुरुंग लागू शकतोच, पण आपल्या विचार करण्याच्या शक्तीला धक्का लागू शकतो. परिणामी आपल्या नातेसंबंधात कायमस्वरुपी फूट पडू शकते. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. मुलांच्याबाबतीत सहनशीलता बाळगा किंवा तुमच्या पेक्षा कमी अनुभवी व्यक्तींबाबत धीर धरा. प्रेमप्रकरण दोलायमान होऊ शकते. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. आज तुम्हाला एक असा अनुभव मिळणार आहे, ज्याने तुम्ही आयुष्यातील दु:ख विसरून जाल.

धनु राशी भविष्य (Sunday, December 02, 2018)

तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. घरच्या आघाडीवर अडचण संभवते त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. रोमान्ससाठी आजचा दिवस फार काही योग्य नाही, खºया प्रेमाची अनुभूती मिळणे अशक्य आहे. कर आणि विमाविषयक कामकाजाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुमच्या जोडीदाराची प्रकृती ढासळल्यामुळे तुमच्या कामावर परिणाम होईल, पण ही वेळ तुम्ही निभावून न्याल.

मकर राशी भविष्य (Sunday, December 02, 2018)

आजच्या विशेष दिवशी तुमच्या तंदुरुस्तीमुळे तुम्ही एखादे असामान्य काम कराल. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुमचं तुमच्या जोडीदाराशी एखाद्या जुन्या कारणावरून भांडण होईल, उदा. तो/ती तुमचा वाढदिवस विसरणे इत्यादी. पण दिवसाच्या शेवटी सगळं काही व्यवस्थित होईल.

कुम्भ राशी भविष्य (Sunday, December 02, 2018)

तुमच्या पुढे जाण्यासाठी कुणीतरी तुमचा मूड बिघडविण्याचा प्रयत्न करेल परंतु तुम्हाला त्रास देण्याचा हा प्रयत्न तुम्ही यशस्वी होऊ देऊ नका. या सगळ्या फुकाच्या चिंता आणि काळज्या यामुळे तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि कदाचित त्वचाविषयक समस्या उद्भवेल. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आणि भविष्याची योग्य योजना करण्याची गरज आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे तुम्हाला रिकामपण वाटेल. पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यातून खूप काही शिकायलाही मिळेल. एका लहानशा बाबीवरून तुमच्या जोडीदाराने खोटेपणा केल्यामुळे तुम्ही नाराज असाल.

मीन राशी भविष्य (Sunday, December 02, 2018)

मौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. एका मित्र/मैत्रिणीच्या समस्येमुळे तुम्हाला वाईट वाटेल आणि त्यांची चिंता वाटेल. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह आजच्या दिवशी दुर्भाग्यपूर्ण, अनर्थावह ठरेल. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल.

Show More

Related Articles

Back to top button
Close