घरा समोर नसाव्यात या पाच गोष्टी, येतात आर्थिक समस्या

वास्तुशास्त्र मध्ये काही उपायांच्या माध्यमातून सांगितलं गेलं आहे कि घराच्या आतील नकारात्मक ऊर्जा दूर करता येतात. नकारात्मक ऊर्जा फक्त घरात असते असं नाही तर घराच्या आसपास देखील ती एकत्रित होत असते. त्यामुळे फक्त घराच्या आत मध्येच नाही तर घराच्या मुख्य दरवाजाच्या समोरील वस्तूंकडे देखील लक्ष दिले पाहिजे. वास्तु नियमा अनुसार अश्या कोणकोणत्या वस्तू आहेत ज्या मुख्य दरवाजा समोर नसल्या पाहिजेत.

वास्तु नियमाच्या अनुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर झाड किंवा खांब असणे आपत्यास कष्ट होतात. अपत्यांचा म्हणजेच मुलाबाळांचा विकास योग्य प्रकारे होत नाही त्यांच्या करियर मध्ये समस्या येतात.

  • आपल्या वास्तुच्या मुख्य दरवाजाच्या समोर खड्डा किंवा विहीर असल्याने मानसिक रोग आणि समस्या होऊ शकतात.

  • दरवाजा समोर चिखल असल्यास शोक होतो म्हणजेच दुःख होते.
  • मुख्य दरवाजाच्या समोर येऊन रस्ता / मार्ग समाप्त होत असेल तर एखादे मोठे नुकसान होते.
  • मुख्य दरवाजाच्या समोर अस्वच्छ पाणी जमा होणे देखील आर्थिक बाबतीत नुकसानदायी होते.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.