30 वर्ष वयाच्या नंतर देखील केस राहतील काळे, फक्त करा हा उपाय

30 वर्ष वय पार केले कि अनेक लोकांचे केस पांढरे होतात आणि कधीकधी तर त्या अगोदर देखील पांढरे केस होण्याची समस्या होते. तर काही लोकांचे केस गाळण्याची सुरुवात होते आणि त्यांना टक्कल देखील पडायला लागते. त्यामुळे 30 वर्ष वय ओलांडल्या नंतर केसांची खाली दिलेल्या टिप्स ने काळजी घेणे उपयोगी होऊ शकते.

या टिप्सच्या मदतीने आपले केस मजबूत राहतील आणि आपल्याला पांढरे आणि गळणाऱ्या केसांच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.

तेला ने मालिश केल्याने केस मजबूत बनून राहतात आणि यामध्ये कोरडेपणा येत नाही. खरंतर कोरडे केस लवकर तुटतात. त्यामुळे आपण केसांना कोरडे होऊ देऊ नका आणि आठवड्यातून तीन वेळा केसांची मालिश करा. केसांना नारळाचे तेल लावले तर त्यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होतो आणि ते आतून मजबूत होतात. आपण केस धुण्याच्या अर्धातास अगोदर नारळाचे तेल व्यवस्थित केसांच्या मुळांना लावा आणि अर्धा तासा नंतर केस धुतले तरी चालेल. असे केल्याने स्कैल्पचा कोरडेपणा दूर होईल आणि केस मऊ होतील.

शैम्पू मध्ये केमिकल भरपूर प्रमाणात असतात आणि हे केमिकल केसांच्या आरोग्यासाठी चांगले नसतात. जास्त केमिकल असलेल्या शैम्पू ने केस कमकुवत होऊन तुटतात आणि पांढरे होतात. पण शैम्पू मध्ये एक चमचा साखर मिक्स केली तर केमिकल चा वाईट प्रभाव केसांवर पडत नाही असे मानले जाते. त्यामुळे आपण केसांना धुण्याच्या अगोदर शैम्पू मध्ये साखर मिक्स करावी आणि नंतर केस त्याने धुवावेत.

अंडा केसांसाठी उत्तम मानले जातात आणि यास केसांवर लावल्याने केस पांढरे होत नाहीत आणि गळत देखील नाहीत. त्यामुळे आपण एका महिन्यात कमीत कमी दोन वेळा केसांना अंड्याचा पैक आवश्य लावा. अंड्याचा पैकी तयार करण्यासाठी एक अंडा फोडून त्यास व्यवस्थित मिक्स करा. यानंतर यामध्ये एक केळ मैश करून टाका. हा पैक अर्धा तास आपल्या केसांवर लावा आणि कोमट पाण्याने स्वच्छ करा.

केसांना काळे ठेवण्यासाठी यावर आवळा पावडर लावा. आवळा पावडर केसांना लावल्याने केस पांढरे होणार नाहीत. आपण आवळा पावडर मध्ये चहा दूध न घातलेला मिक्स करून पेस्ट बनवा. या नंतर ही पेस्ट व्यवस्थित केसांना लावा. जेव्हा हा पैक कोरडा होईल तेव्हा पाण्याच्या मदतीने केस स्वच्छ करा. महिन्यातून एकदा ही पेस्ट केसांना लावल्याने केस एकदम हेल्दी आणि काळे राहतील.