घरचा डबा नवरा दररोज देत होता भिकाऱ्याला, सत्य समजताच बायकोने भिकाऱ्या सोबत लग्न केलं

प्रेमाचे तर अनेक प्रकार आहे जसे आई-वडिलांचे प्रेम, भाऊ-बहिणीचे प्रेम किंवा पती-पत्नीचे प्रेम. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याना कोणत्या प्रकारचे प्रेम हे असतेच. प्रेम हि एक अनमोल भावना आहे. पण याच प्रेमा मध्ये काही छोटेछोटे वाद देखील प्रेम संपण्यास कारणीभूत होतात. प्रत्येक घरामध्ये असे होते कि आई आपल्या मुलाला दररोज एकच भाजी देते आणि त्यामुळे कंटाळून मुलगा आपल्या आईला एक दिवस बोलतो कि रोज एकाच प्रकारची भाजी किंवा रोज भोपळाच का बनवतेस.

आणि अश्या वेळी आई टोमणा मारते कि जर आवडत नसेल तर लग्न कर आता हे सगळं माझ्या कडून होत नाही आहे. हे सगळ्या घरामध्ये होणारी घटना आहे. पण लग्न झाल्या नंतर काय होत हे पुरुषांना चांगलंच माहीत आहे. कारण लग्न झाल्या नंतर पुरुषाचे सगळे नखरे संपतात आणि घराची जबाबदारी खांद्यावर येते. पण आज आम्ही तुम्हाला एक अशी घटना सांगत आहोत जी भोपळ्याच्या भाजी विषयी आहे. जी समजल्या नंतर तुम्हाला आश्चर्य होईल.

खरंतर ही घटना युपी मधली आहे. येथे श्रावस्ती नावाची एक महिला राहत होती आणि तिचा नवरा आशीष होता. हि घटना काही अश्या प्रकारची आहे श्रावस्ती आपल्या पतीला म्हणजेच आशिषला दररोज सकाळी टिफिन (डबा) बनवून द्यायची आणि आशिष तो घेऊन मजुरी करण्यास जात असे. सगळ्यात महत्वाची गोष्ट हि आहे कि त्याची पत्नी त्याला दररोज टिफिन मध्ये एकच प्रकारे बनलेली भोपळ्याची भाजी देत होती पण तरीही आशिष काहीही बोलत नव्हता. ज्यामुळे तिला आपल्या नवऱ्यावर शक आला.

खरंतर श्रावस्ती आपल्या नवऱ्याला जवळपास 20 दिवसा पासून डब्यामध्ये भोपळ्याची भाजी देत होती श्रावस्तीचा नवरा कामावर जातांना हा डबा एका भिकाऱ्याला देत होता. एक दिवस बायकोला शक आल्यामुळे तिने आपल्या नवऱ्याचा पाठलाग केला आणि सत्य समजलं आणि तिने आपल्या नवऱ्याला समोरच जाब विचारला.

आशीष काही उत्तर देण्याच्या अगोदरच भिकाऱ्याने रोमॅंटिक होऊन दोन-चार लाईन शायरी बोलल्या त्यानंतर काय? आशीषची पत्नी श्रावस्तीला वाटले जसे काही तिला तिचे लहानपणीचे प्रेम भेटले आहे ज्यास कधी ती गमावून बसली होती. त्याच वेळी श्रावस्ती ने आशीष सोबतचे नाते तोडले आणि भिकाऱ्या सोबत जाऊन मंदिरा मध्ये लग्न केले आणि आता त्याच मंदिरा समोर दोघे एकत्र भिक्षा मागतात. आपण नेहमी ऐकतो कि प्रेम आंधळे असते आणि ते कधीही कोणाही सोबत होऊ शकते याची प्रचिती या घटनेवरून येते.