dharmik

कोणत्याही व्यक्तीचे नशीब उघडू शकतात हे 10 काम, आज पासूनच सुरु करा

धर्मशास्त्रामध्ये पंचदेवा बद्दल सांगितले आहे. या पंचदेवा मध्ये गणपती, विष्णू, महादेव, दुर्गा माता आणि सूर्यदेव यांची प्रतिदिन पूजा केली पाहिजे. सूर्यदेव हे एकमेव प्रत्येक्ष दिसणारे देवता आहेत त्यामुळे यांची पूजा दररोज केली पाहिजे. यांच्या पूजेमुळे सर्व दुख, कष्ट दूर होऊ शकतात. आपण ज्यांना सूर्य देव म्हणतो त्यांना ग्रहांचा राजा मानले जाते.

कुंडली मध्ये 12 भाव म्हणजेच 12 स्थान असतात प्रत्येक भावामध्ये सूर्य वेगवेगळे फळ देतो. कुंडली मध्ये असलेल्या स्थितीनुसार जर सूर्यदेवास प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला तर नशिबाची साथ मिळण्याची शक्यता अधिक जास्त वाढते. ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या कुंडलीच्या आधारावर कोणकोणते शुभ काम केले जाऊ शकतात आज येथे आपण पाहू.

जर तुमच्या कुंडलीच्या पहिल्या भावामध्ये सूर्य अशुभ फळ देत असेलत तर तुम्हाला तुमच्या उत्पन्नातील एक हिस्सा गरजू लोकांना मदत म्हणून खर्च केला पाहिजे असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या कमी होऊ शकतात. तसेही कोणाही गरजू व्यक्तीला मदत करणे एक चांगले काम आहे.

जर सूर्य कुंडलीतील दुसऱ्या भावामध्ये अशुभ फळ देत असेल तर तुम्हाला आपल्या वाणी वर लक्ष देण्याची गरज आहे, तुम्ही धार्मिक स्थळी दान करा आणि सदाचाराचे पालन करावे.

जर सूर्य तृतीय भावामध्ये असे तर व्यक्तीने चुकूनही मोठ्या माणसाचा अनादर करू नये. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद मिळवून आणि तीर्थस्थळी यात्रा करून कुंडली मधील सूर्य अनुकूल केला जाऊ शकतो.

जर सूर्य चतुर्थ स्थानी असेल तर अश्या वेळी नेत्रहीन व्यक्तीस 43 दिवस दररोज अन्नदान करावे. तसेच तांब्याचा एक सिक्का किंवा अंगठी धारण करावी.

जर सूर्य पंचम स्थानी असेल तर सूर्याला नियमित अर्ध्य दिले पाहिजे.

जर सूर्य सहाव्या स्थानी असेल तर आपल्या घरी एखाद्या पवित्र नदीचे पाणी ठेवले पाहिजे, तुम्ही रात्री झोपण्याच्या अगोदर डोक्या जवळ पाण्याने भरलेले एखादे भांडे ठेवा,

जर सूर्य सातव्या स्थानी असेल तर जेवणात मिठाचे प्रमाण कमी करावे. काळ्या किंवा विना शिंगाच्या गायीची सेवा करावी.

जर सूर्य आठव्या स्थानी असेल तर कोणतेही नवीन काम सुरु करण्या अगोदर गोड खावे किंवा गोड पाणी प्यावे. कोणत्याही वाहत्या नदी मध्ये गुळ प्रवाहित करावे.

जर सूर्य नवव्या  स्थानी असेल तर तुम्ही दान करताना कधीही चांदीची वस्तू दान करून नये. रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे आणि मधुर बोलले पाहिजे.

जर सूर्य दहाव्या स्थानी असेल तर त्याचा शुभ प्रभाव मिळवण्यासाठी पूर्ण काळे किंवा निळे कापड परिधान करू नये. वाहत्या नदीमध्ये माश्यांना 43 दिवस पिठाच्या गोळ्या खाण्यास घाला. मांसाहार आणि मद्यपान यापासून दूर राहा.


Tags
Show More

Related Articles

Back to top button