astrology

हा नाग आहे भगवान शंकराचा खरा भक्त, मागील 15 वर्षा पासून दररोज येत आहे या मंदिरा मध्ये

हिंदू धर्मा मध्ये श्रद्धा असणाऱ्या लोकांना माहित आहे की या धर्मा मध्ये सर्वात जास्त देवी-देवतांची पूजा केली जाते. सर्व देवी-देवतांची पूजा विविध ठिकाणी केली जाते. परंतु काही देवी-देवता असे आहेत ज्यांची पूजा देशामध्येच नाही तर विदेशात देखील केली जाते. यामधीलच एक आहेत भगवान शिव म्हणजेच शंकर भगवान.

भगवान शंकर हे त्रीदेवा पैकी एक आहेत. यांना अनेक नावांनी ओळखले जाते. भगवान शंकराला, शिव, महादेव, जटाधारी, त्रिकाळ, भोलेनाथ इत्यादी नावाने ओळखले जाते. भोलेनाथ आपल्या सर्व भक्तांचा आवाज ऐकतात, मंग तो कोणीही असो मनुष्य किंवा जीव-जंतू. जेव्हा समुद्र मंथन करताना त्यामधून विष बाहेर आले तेव्हा ते प्राशन करून भगवान शंकराने पृथ्वीला संकटातून वाचवले होते. विष पिण्यामुळे भगवान शंकराचा कंठ निळा झाला. त्यामुळे त्यांना नीलकंठ नावाने देखील ओळखले जाते.

भगवान शंकराची महिमा मोठी आहे. भगवान शंकर आपल्या गळया मध्ये नेहमी सर्प लपेटले असतात. जीव-जंतूवर असलेल्या प्रेमाची प्रचीत यामधूनच येते. तसे तर भगवान शंकराचे अनेक प्रसिध्द मंदिरे आहेत. परंतु काही मंदिरे आपल्या विशेषत्वाने प्रसिध्द आहेत.

आज आम्ही शंकराच्या अश्या एका मंदिरा बद्दल सांगत आहोत, ज्याची आपली एक वेगळी खास बात आहे. हे मंदिर आजकाल आपल्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. तुम्ही देखील या मंदिरा बद्दल ऐकून आश्चर्यचकीत रहाल.

तुम्ही नेहमी मंदिरा मध्ये लोकांना पूजा करताना पाहिले असेल. पण कधी तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये सापाला पूजा करताना पाहिले आहे का? आज आम्ही तुम्हाला अश्या एका मंदिरा बद्दल सांगत आहोत जे उत्तर प्रदेश मधील आगरा जिल्ह्या जवळील सलेमाबाद गावात आहे. आम्ही तुम्हाला ज्या शिव मंदिरा बद्दल सांगत आहोत ते अत्यंत जुने मंदिर आहे. या मंदिरा बद्दल स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की येथे मागील 15 वर्षा पासून दररोज एक नाग येतो आणि भगवान शिव शंकराची पूजा करून कोणालाही नुकसान न करता निघून जातो.

या मंदिरा मध्ये पूजा करण्यासाठी दूर-दूर वरून लोक येतात. लोकांचे म्हणणे आहे की नाग दररोज या मंदिरा मध्ये येतो आणि जवळपास 5 तास येथे असतो. दररोज नाग सकाळी 10 वाजता येतो आणि 3 वाजे पर्यंत येथे असतो. आजूबाजूच्या गावा मध्ये या नागा बद्दल चर्चा होत आहे. जेव्हाही हा नाग मंदिरा मध्ये येतो तेव्हा मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल की नाग हा विषारी जीव असून देखील मंदिरा मध्ये येणारे भक्त यास जराही घाबरत नाहीत.


Show More

Related Articles

Back to top button