Connect with us

मृत्यूपूर्वी यमदेव प्रत्येकाला देतात हे 4 संकेत, तुम्हाला तर मिळाले नाहीत ना?

Astrology

मृत्यूपूर्वी यमदेव प्रत्येकाला देतात हे 4 संकेत, तुम्हाला तर मिळाले नाहीत ना?

सृष्टीचे काही नियम असून प्रत्येकाला ते पाळावेच लागतात, मृत्यूसुद्धा त्यामधील एक आहे. जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाचा मृत्यू निश्चित आहे. हे सत्य कोणीही बदलू शकत नाही परंतु आपला मृत्यू केव्हा होणार याविषयी अगोदरच समजू शकते. मान्यतेनुसार, यमदेवाचे दूत प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मृत्यूपूर्वी यमदेवाचे 4 संदेश पाठवतात. यावरून कोणाचा मृत्यू कधी होणार याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.

एका प्रचलित कथेनुसार, यमदेवाने त्यांचा भक्त अमृतला वचन दिले होते की, ते प्रत्येक व्यक्तीला मृत्यूपूर्वीच 4 संकेत देती

यमदेव आणि भक्त अमृतची कथा

प्राचीन काळी, यमुना नदीच्या कतहावर अमृत नावाचा एक व्यक्ती वास्तव्यास होता. तो यमदेवाची दिवसरात्र पूजा करत असे कारण त्याला मृत्यूची भीती होती. यमदेव, अमृतच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वरदान मागण्यास सांगितले.

यमदेवाचे शब्द ऐकून अमृतने त्यांच्याकडे अमरत्वाचे वरदान मागितले. त्याचे वरदान ऐकल्यानंतर यमदेवाने त्याला समजावून सांगितले की, जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी मृत्यूला सामोरे जावेच लागते. कोणताही मनुष्य मृत्यूला टाळू शकत नाही. त्यानंतर अमृतने यमदेवाकडे मागणी केली की, मृत्यूला टाळणे शक्य नसेल तर मग कमीत कमी मृत्यू माझ्याजवळ आल्यानंतर मला त्याविषयी माहित व्हावे. ज्यामुळे मी माझ्या कुटुंबाची पूर्ण व्यवस्था लावून ठेवू शकेल.

यानंतर यमदेवाने अमृतला मृत्यूपूर्वी तुला सूचना मिळेल असे वचन दिले. यमदेवाने त्याला सांगितले की, तुला मृत्यूचा संकेत मिळाल्यानंतर तू लगेच या संसाराचा निरोप घेण्याची तयारी करून ठेव. त्यानंतर यमदेव अदृश्य झाले. त्यानंतर अनेक वर्ष उलटून गेले आणि यमदेवाच्या वचनामुळे अमृत विलासतापूर्ण आयुष्य जगू लागला. आता त्याला मृत्यूची काहीही भीती नव्हती. हळू-हळू त्याचे केस पांढरे होऊ लागले, काही वर्षांनंतर त्यांचे दात पडले, त्यांनतर त्याची दृष्टी क्षीण झाली आणि अजूनही त्याला यमदेवाचा कोणताही संदेश मिळाला नव्हता. अशाप्रकारे आणखी काही वर्ष निघून गेले आणि आता तो अंथरुणातून उठूही शकत नव्हता, त्याचे शरीर सुन्न पडले होते. परंतु मनातल्या मनात त्याने यमदेवाचे आभार मानले होते की अजूनही त्याला मृत्यूचा कोणताही संदेश मिळाला नव्हता.

असे जीवन जगात असताना एके दिवशी तो खूप घाबरला कारण त्याच्याजवळ यमदूत उभे होते. त्याने घाबरून घरात यमदेवाचे पत्र शोधण्यास सुरुवात केली परंतु त्याला कोणतेही पत्र सापडले नाही आणि त्याने यमदेवावर धोका दिल्याचा आरोप लावावा.

तेव्हा यमदेवाने नम्रतेने त्याला उत्तर दिले की, मी तुला 4 संदेश पाठवले होते परंतु तुझ्या लोभ आणि विलासातपूर्ण जीवनशैलीने तू आंधळा झाला होता. तुझे केस पांढरे झाले हा पहिला संकेत होता, दात पडलेला दुसरा, दुष्टी क्षीण झालेला तिसरा आणि तुझ्या शरीराच्या संपूर्ण अवयवांनी काम बंद केलेला मला चौथा संदेश होता. परंतु तुला यामधील एकही संदेशाचा अर्थ समजला नाही.

अशाप्रकारे यमदेव प्रत्येकाला त्याच्या मृत्यूपूर्वी हे संदेश अवश्य पाठवतात….

पहिला संदेश-केस पांढरे होणे.

दुसरा संदेश – दात पडणे.

तिसरा संदेश-दृष्टी क्षीण होणे.

चौथा संदेश– कंबर वाकणे किंवा शरीराच्या अवयवांचे काम बिघडणे.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top