या 7 सवयी असलेले लोक बनतात सगळ्यात वाईट नातेवाईक, यांना घरी बोलावणे पसंत करत नाही लोक

नातेवाईकांचे असणे चांगले आणि वाईट दोन्ही असते. चांगले असे कि जेव्हा एखादे फंक्शन असते तेव्हा एक चांगले वातावरण निर्माण होते तसेच अडचणीच्या वेळी काही नातेवाईक आपल्या मदतीला येतात. पण वाईट यासाठी कि काही नातेवाईत आपल्याला जरा जास्तच त्रास देतात. त्यांच्या मध्ये काही वाईट सवयी असतात ज्या समजल्या नंतर कोणीही त्यांना आपल्या घरी बोलावणे पसंत करत नाहीत. त्यामुळे जर आपल्याला या सवयी असतील तर त्यांना त्वरित बदलले पाहिजे.

जे नातेवाईक लोकांच्या घरी जाऊन अनेक दिवस विनाकारण बसून राहतात. त्यामुळे घरातील लोक त्यांना कंटाळतात. त्यामुळे आपण जेव्हा लोकांच्या घरी पाहुणे म्हणून जाऊ तेव्हा फक्त काही दिवसच त्यांच्याकडे राहिले पाहिजे. शेवटी त्यांची देखील एक पर्सनल लाईफ आणि प्रायव्हसी असतेच ज्याची त्यांना सवय झालेली असते. त्यामुळे त्यांना जास्त डिस्टरब करू नये.

जेव्हा आपण लोकांकडे पाहुणे म्हणून जातो तेव्हा याचा अर्थ हा नाही कि आपण काहीही काम केले नाही पाहिजे आणि फक्त राजा किंवा राणी प्रमाणे आरामात बसून त्यांच्याकडून सेवा करून घेतली पाहिजे. जर आपण थोडीफार कामामध्ये हेल्प केली तर समोरील लोकांना देखील चांगले वाटेल. नाहीतर ते तुम्हाला जास्त दिवस झेलू शकत नाहीत.

आपण आपल्या घरी कसेही राहत असलो तरी दुसऱ्याच्या घरी नखरे नाही केले पाहिजे. काही लोक लहानसहान गोष्टी देखील एड्जस्ट नाही करू शकत. असे लोक दुसऱ्याच्या घरी पाहुणे म्हणून जातात आणि त्यांच्याच चुका काढत राहतात. हे आवश्यक नाही आणि शक्य देखील नाही कि ज्या सुविधा तुम्हाला आपल्या घरा मध्ये मिळतात त्या दुसऱ्याच्या घरा मध्ये देखील मिळतीलच. त्यामुळे थोडे एड्जस्ट करणे शिकले पाहिजे.

दुसऱ्याच्या पर्सनल लाइफ मध्ये जास्त हस्तक्षेप करणारे. टोमणे मारणारे आणि निंदा करणारे नातेवाईक कोणालाही आवडत नाहीत. आता जग बदलले आहे आणि सगळे आपल्या पद्धतीने आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांच्या कामामध्ये वैयक्तिक आयुष्यात लुडबुड करू नये. त्यांना त्यांचे आयुष्य शांतपणे आणि त्यांच्या पद्धतीने जगू देणे चांगले राहील.

तुझं लग्न कधी होणार? परीक्षेत किती मार्क मिळाले? नोकरी कधी मिळणार? असे बोलून मुलांना जास्त त्रास आणि लज्जास्पद करू नये. जे नातेवाईक नेहमी असे करतात त्यांना मुले आणि मोठे देखील बिलकुल पसंत करत नाहीत. ज्याच्या नशिबा मध्ये जेव्हा आणि जेवढे लिहलं आहे ते त्यांना मिळणारच आहे. आपण दुसऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम नाही केले पाहिजे.

जेव्हा दुसऱ्याच्या घरी जातो तेव्हा त्यांच्या खर्चाची काळजी घ्यावी. असे होता कामा नये कि आपल्यामुळे त्यांचे भरपूर पैसे खर्च व्हावेत. आपण देखील बाजारातून घरच्यांसाठी फळे, मिठाई इत्यादी वस्तू घेऊन येऊ यामुळे आपण ज्यांच्याकडे पाहुणे म्हणून आले आहोत त्यांना देखील चांगले वाटेल.

जर आपण बाहेरगावी गेलो आणि आपल्याला ते शहर पाहण्याची इच्छा आहे तर प्रयत्न करा कि घरातील एखाद्या बीजी व्यक्तीला त्यासाठी तुम्ही त्रास देणार नाहीत. काही नातेवाईकांची सवय असते कि ते स्टेशन वरून घरी किंवा घरून स्टेशनवर किंवा शहरामध्ये कोठेही फिरायला जायचे असेल तर समोरच्याला त्रास देतात. त्यांना गाडी घेऊन बोलावतात. जर समोरील व्यक्ती स्वताच्या इच्छेने येत असेल तर काही हरकत नाही पण जर तो बीजी असेल तर आपण स्वतः ट्रेव्हल करणे शिकले पाहिजे.

आता हे सांगण्याची गरज नाही कि आपण हि पोस्ट शेयर करा ज्यामुळे आपले नातेवाईक इनडायरेक्ट्ली यास वाचून तरी स्वता मध्ये थोडाफार बदल करतील.