money

आजोबा-पणजोबांच्या कोणकोणत्या संपत्तीवर नातू आणि नातीचा हक्क असतो? कायदा हे सांगतो

काही दिवसापूर्वी दिल्ली हायकोर्टाने निकाल दिला की वडिलांची पूर्ण संपत्ती मुलाला मिळू शकत नाही कारण अजून आई जिवंत आहे आणि संपत्ती मध्ये बहिणीचा देखील अधिकार असतो. कायद्याच्या अनुसार वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीचा अर्धा हिस्सा पत्नीला आणि आर्धा दोन आपत्याना (एक मुलगा आणि एक मुलगी) यांना मिळाला पाहिजे. पण मुलाने आपल्या बहिणीला प्रोपर्टी देण्यास नकार दिला.

यावर दिल्ली हायकोर्टात हिंदू उत्तराधिकार अधिनियम प्रमाणे निकाल दिला गेला. कोर्टाने मुलीचा देखील संपत्तीवर समान हक्क असल्याचे सांगितले. अश्यात आज आम्ही तुम्हाला आजोबा आणि पणजोबाची संपत्ती मिळणाऱ्या या कायद्या बद्दल माहिती देत आहोत.

पैतृक संपत्ती म्हणजे काय?

वडील, आजोबा किंवा पणजोबा यांच्या कडून मिळणाऱ्या संपत्तीला पैतृक संपत्ती किंवा कौटुंबिक संपत्ती बोलतात. बाळाचा जन्म होताच तो पैतृक संपत्तीचा अधिकारी होतो.

स्वताच्या कमाईने उभी केलेली संपत्ती स्वर्जित संपत्ती असे म्हणतात. तर वंश परंपरागत मिळालेली संपत्ती पैतृक संपत्ती म्हणतात.

पैतृक संपत्ती विकण्यासाठी सर्व हिस्सेदारांची संमती घेणे आवश्यक असते. जर कोणत्याही एकाची जरी असहमती असेल तर पैतृक संपत्ती विकता येत नाही.

2005 मध्ये झाले संशोधन

2005 च्या अगोदर हिंदू कुटुंबात फक्त मुलालाच पैतृक संपत्ती मिळू शकत होती. 2005 मध्ये हिंदू उत्तराधिकारी अधिनियम मध्ये संशोधन केल्या नंतर मुलगा आणि मुलगी दोघांना संपत्ती मध्ये समान हक्क दिला गेला.

हिंदू उत्तराधिकारी अधिनियम बौद्ध, सिख आणि जैन समुदायावर देखील लागू होतो. 20 डिसेंबर 2004 च्या अगोदर मुलींना हिस्सा नाही.

कोणत्याही पैतृक संपत्तीची वाटणीहिस्सा 20 डिसेंबर 2004 अगोदर झाला असेल तर मुलीचा हक्क राहणार नाही. कारण या बाबतीत पूर्वीचा हिंदू उत्तराधिकार अधिनियम लागू होईल.

कायदे तज्ञांच्या मध्ये या अवधीच्या पर्यंत मुलींचे पैतृक संपत्तीमध्ये हिस्सेदारी नव्हती त्यामुळे त्याअवधी पर्यंत केलेले वाटणीहिस्से फक्त मुलांनाच संपत्तीत हिस्सा देतात.


Show More

Related Articles

Back to top button