Uncategorized

माणसाचे उंची अनुसार किती वजन असले पाहिजे, तुम्हीच पहा

माणसाचे उंची अनुसार किती वजन असावे? हा एक सामान्य प्रश्न आहे. परंतु या प्रश्नाचे उत्तर सर्वांना जाणून घ्यायचे असते. कारण व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी त्याचे वजन, वय आणि उंची यांच्या अनुसार योग्य वजन असणे आवश्यक आहे. जर तुमच्याही मनामध्ये हा प्रश्न असेल तर या प्रश्नाचे उत्तर या आर्टिकल मध्ये तुम्हाला मिळेल.

तुम्हाला माहित आहेच की व्यक्तीचे वजन जास्त असले तर ते आरोग्यासाठी हानिकारक असते. आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये लोकांच्या जीवनावर याचा वाईट परिणाम झालेला आहे. लोकांचे खाणेपिणे बरोबर राहिले नाही आहे. बहुतेक लोकांना वजन वाढणे, मधुमेह, ब्लड प्रेशर आणि अश्या अनेक आरोग्याच्या समस्येने घेरले आहे. परंतु आपल्याला समस्या काय आहे आणि यागोष्टीची माहिती आपण कशी मिळवू शकतो यासाठी आपल्याला योग्य वजन किती असावे हे माहित असणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला माहित करून घ्यायचे असेल की तुमचे वजन किती असले पाहिजे तर यासाठी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. जसे की तुमचे वय किती आहे, उंची किती आहे, लिंग काय आहे आणि तुमचे बोन डेनिसिटी किती आहे या सर्वामध्ये सगळ्यात महत्वाचे आहे तुमची उंची आणि वय किती आहे. काही आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे कि तुम्हाला आपले बॉडी मास इंडेक्स मोजले पाहिजे. हे तुम्हाला उंची अनुसार किती वजन असावे हे सांगते. खाली दिलेल्या चार्ट वरून तुम्हाला याचा अंदाज येईल.

वर दिलेल्या चार्ट पेक्षा जर तुमचे वजन कमी असेल तर तुम्ही अंडर वेट कैटेगरी मध्ये मोडता आणि जर तुमचे वजन तुमच्या उंचीच्या अनुसार जास्त आहे तर तुम्ही ओवरवेट कैटेगरी मध्ये आहेत. यादोन्ही परिस्थिती मध्ये तुम्हाला आरोग्य संपन्न म्हणता येणार नाही जर तुमचे वजन जास्त असेल तर तुम्हाला भरपूर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

चला पाहू ओवरवेट झाल्यास कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते

जर तुमचे वजन वाढले असेल तर तुम्हाला डायबेटीस होण्याची शक्यता आहे कारण जेव्हा तुम्ही अन्नामध्ये ग्लुकोजचे सेवन जास्त करता तेव्हा तुमचे वजन वाढते. ज्यामुळे तुम्हाला डायबेटीस होण्याची शक्यता वाढते.

वजन वाढलेल्या लोकांना बहुतेक वेळा सांधेदुखीचा त्रास होतो. उठता बसताना त्यांना वेदनांना सामोरे जावे लागते. तसेच वजन वाढल्यामुळे पायावर आणि गुडघ्यावर जास्त भार पडतो आणि कार्टीलेजचे प्रमाण कमी झाल्याने आर्थराइटिसची समस्या होऊ शकते. एक किलो वजन वाढण्याचा अर्थ आहे की पायावर 4 ते 6 पट दबाव वाढणे.

Related Articles

Back to top button