FoodHealth

लोक का पाहतात थंडीच्या दिवसात पेरू येण्याची वाट, जाणून घ्या काय आहे फायदे

फळ व्यक्तीच्या शरीराला फायदा करतात पण त्यांचे फायदा करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तसे तर फळांचा राजा आंबा आहे पण पेरू देखील आंब्यापेक्षा कमी नाही आहे. खास करून हिवाळ्यात येणारे पेरूची तर गोष्टच वेगळी आहे. या काळात येणाऱ्या पेरूंचा स्वाद वेगळाच असतो ज्याच्याकडे सगळे आकर्षित होतात. पण हे सगळीकडे मिळत नाहीत आणि जेथे मिळतात तेथे किंमत दुप्पट असते.

पेरू फक्त स्वादिष्ट असतो असे नाही तर याचे फायदे देखील भरपूर आहेत. विचार करा थंडी मध्ये लोक का पाहतात याच्या येण्याची वाट. तुम्हाला या बद्दल जाणून घेतले पाहिजे आणि या फळाच्या चवीचा स्वाद घेतला पाहिजे.

लोक हिवाळ्यात पेरूच्या येण्याची वाट का पाहतात

तुम्ही कधी चाट मसाल्याच्या सोबत पेरू खाण्याचा आनंद घेतला आहे का? जर नाही तर आजच बाजारातून पेरू खरेदी करून त्यावर चाट मसाला लावून खाण्याचा आनंद घ्या. असे केल्यानंतर तुम्ही ही पोस्ट नक्कीच इतरांच्या सोबत शेयर कराल. पेरू मध्ये विटामिन आणि खनिज असतात जे शरीराला आजारी होण्या पासून वाचवते, चला तर पाहू हिवाळ्यात म्हणजेच थंडीच्या मौसमा मध्ये पेरू खाण्याचे फायदे.

पेरू मैग्जीनचा चांगला स्रोत मानला जातो जे आपल्या शरीराला दुसऱ्या पदार्था मधून मिळणाऱ्या महत्वाच्या पोषक तत्वांना ग्रहण करण्यास मदत करतो. पेरू मध्ये असलेले पोटैशियम रक्त दाब सामान्य ठेवण्यास मदत करतो. तसेच हृद्य आणि मासपेशींना पेरू फायदा करतो.

पेरू मध्ये 80 टक्के पाणी मिश्रित असते जे त्वचेचा ओलावा कायम ठेवतो. याच सोबत पेरू व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. पेरू मध्ये फाइबर असते जे डायबेटीस रुग्णांसाठी फायदेशीर असते.

थंडीच्या दिवसात जर तुम्ही पेरुचे नियमित सेवन करत असाल तर सर्दी खोकल्या सारखे आजार होण्याची शक्यता कमी होते. पेरू मध्ये असणारे विटामिन ए आणि ई डोळे, केस आणि त्वचेला भरपूर प्रमाणात पोषण देते.

पेरू मध्ये असणारे लाइकोपीन नावाचे पोषक तत्व शरीराला होणाऱ्या गंभीर आजार जसे कैंसर आणि ट्युमर यांना दूर ठेवते. पेरू मध्ये बीटा कैरोटीन असते जे शरीराला त्वचे संबंधित आजारा पासून वाचवते.

अनेक लोक पेरूच्या बियांना खात नाहीत पण याचे बीज खाणे जास्त फायदेशीर असते. ज्यामुळे पोट साफ राहते. पेरू पचनक्रिया योग्य ठेवते.

पेरू खाल्ल्यामुळे दात आणि हिरड्या मजबूत राहतात आणि पेरूच्या पानांमुळे तोड आलेले असल्यास आराम मिळतो. त्याच सोबत पेरूचा रस कोणत्याही प्रकारची जखम लवकर भरून काढतो.

Show More

Related Articles

One Comment

  1. Sir / Madam
    Your posts found very much beneficial and working like stimulators to go for our traditional food habits. Thanks a lot for sharing such valuable information. It is also requested to prov8de posts on specific treatments like for gastritis what should be diet, allowed fruits and nuts etc.
    Thanks again

Back to top button
Close