health

5 मिनिटात पांढरेशुभ्र दात करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

तुम्ही दिसायला किती सुंदर आहात हे अनेक घटकांवरून ठरत असते. यामधील एक घटक आहे तुमचे स्मित म्हणजे तुमचे हास्य किती सुंदर आहे. जेव्हा तुम्ही हासता तेव्हा चेहऱ्यावर एक तेज येते यामुळे तुम्ही अधिक सुंदर दिसता. परंतु जर तुमचे दात पिवळे असतील तर समोरील बघणाऱ्या व्यक्तीला ते किळसवाणे वाटते म्हणून सुंदर आणि पाढरे स्वच्छ दात असणे आवश्यक आहे. खालील टिप्स वापरून तुम्ही दातांचा पिवळे पणा दूर करू शकता.

Dental Health Care Tips In Marathi

  • पिवळे दात सफेद करण्यासाठी घरगुती उपाय आहे बेकिंग सोडा. गरम पाण्यामध्ये बेकिंग सोडा मिक्स करून गुळण्या कराव्यात. तोंडातून पाणी बाहेर फेकल्यानंतर दात बोटांनी स्क्रब करा यामुळे दात चमकदार होतील.
  • दात स्ट्रोबेरीने घासल्यास दात सफेद होतात.
  • जर सफेद दात पाहिजे असतील तर दातांना लिंबूच्या रसाने मालीश करा. थोडया राईचे तेल आणि मिठा मध्ये लिंबूचे स्लाईस डूबवून दात ५ मिनिटे साफ करा नंतर दातांना ब्रश करा.
  • दात संत्र्याच्या सालीने स्क्रब करणे हा देखील दात स्वच्छ करण्यासाठी एक घरगुती उपाय आहे.


Show More

Related Articles

Back to top button