आंघोळ करताना गीझरचा स्फोट होऊ शकतो, ही सवय ताबडतोब सुधारा, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल

Water Heater Geyser: जर तुमच्या घरात गिझर (Water Heater Geyser) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. घरा मध्ये गिझर वापरत असाल तर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या या बद्दल आज आपण येथे जाणून घेऊ.

थंडीच्या दिवसात गिझर ही गरज बनली आहे. सकाळी लवकर गरम पाण्याने अंघोळ करण्याचा आनंद घ्यायचा असतो तर गरम पाण्यासाठी गिझर सोयीस्कर पडते. अशा परिस्थितीत लोक घरात गिझर लावतात.

गीझर जितके फायदेशीर आहे तेवढेच ते धोकादायक देखील ठरू शकते. कारण गीझरसोबत आपल्याला अनेक खबरदारी घ्यावी लागते. ही खबरदारी न घेतल्यास मृत्यूचा धोका देखील संभवतो. ते कसे, आम्ही तुम्हाला येथे सांगत आहोत.

घरातील एक सदस्य नक्कीच असा असतो जो नेहमी गिझर चालू करून नंतर बंद करायला विसरतो. गीझर जास्त वेळ चालू राहिल्यास गिझरमध्ये स्फोट होण्याची घटना घडू शकते. असे कोणाच्याही बाबतीत होऊ नये याची आम्ही तुम्हाला जाणीव करून देत आहोत.

1. जेव्हा तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी गीझर चालू कराल तेव्हा अगोदर गीझर बंद करण्याची वेळ निश्चित करा म्हणजे तुम्ही गिझर बंद करायला विसरणार नाही. तसे, आजकाल जे गिझर येतात ते आपोआप बंद होतात. परंतु ज्यांच्याकडे जुने गिझर आहेत त्यांच्याकडे स्वयंचलित स्विच ऑफ यंत्रणा नाही. अशा परिस्थितीत गिझर कधी बंद करायचा हे लक्षात ठेवावे लागेल.

2. जेव्हा तुम्ही गिझर खरेदी करता तेव्हा ते स्वतः फिट करण्याचा प्रयत्न करू नका. कारण जर तुम्ही स्वतः प्रयत्न केले आणि वायरींग इकडे तिकडे झाली असेल तर ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. तसेच नेहमी ISI चिन्हांकित गिझर खरेदी करा. लोकल गिझर चुकूनही खरेदी करू नका.

3. गॅस सिलेंडरचा ट्रेंड सध्या खूप सुरु आहे. त्यात ब्युटेन आणि प्रोपेन नावाचे वायू असतात. ते कार्बन डायऑक्साइड तयार करतात. जर तुम्ही ते तुमच्या बाथरूममध्ये लावत असाल तर लक्षात ठेवा की तेथे एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यातून जो काही गॅस निघतो तो बाथरूममध्ये जमा होणार नाही. कारण ते शरीरासाठी चांगले नाही.

4. गीझर मुलांच्या आवाक्यांपासून दूर ठेवावा. जेणेकरून मुलांनी गिझरला हात लावू नये. यामुळे त्यांना विजेचा धक्काही बसू शकतो.

मित्रानो Water Heater Geyser बद्दल वरील काळजी घेतल्यास कोणतीही अप्रिय घटना घडण्याचे तुम्ही टाळू शकता.

सरकारी योजना, नोकरी, राशी भविष्य आणि सर्व बातम्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा ग्रुप जॉईन करा.

महत्वाची सूचना व्हाट्सअप मध्ये लॉंडींग स्क्रीन दिसत असल्यास बॅक करून पुन्हा वरील लिंकवर क्लिक करा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Follow us on

Sharing Is Caring: