गुपचूप लॉन्च झाला Smartphone, किंमत 7 हजारांपेक्षा कमी, दमदार बॅटरी आणि जबरदस्त कॅमेरा, वैशिष्ट्ये जाणून घ्या

Smartphone Under 7000: Smartphone सर्वांच्या पसंतीस आले आहेत त्यांचा वापर करणे सोप्पे असण्या सोबतच मल्टिटास्किंग करता येते. याच कारणामुळे बजट स्मार्टफोन्सची मागणी देखील मार्केट मध्ये वाढली आहे.

मार्केट मध्ये असे अनेक स्मार्टफोन्स आहेत, ज्यांची किंमत 7 हजार रुपयांपेक्षा कमी आहे, पण फीचर्स तगडे आहेत. LAVA ने भारतात 7,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा स्मार्टफोन लॉन्च केला आहे, जो शक्तिशाली फीचर्स सोबत येतो.

Lava X3 असे या Smartphone चे नाव आहे. हा फोन थेट Redmi A1+, Realme C33 सारख्या फोनशी स्पर्धा करेल. चला जाणून घेऊया Lava X3 ची किंमत आणि फीचर्स काय आहेत.

Lava X3 Price In India

Lava X3 ची किंमत मात्र 6,999 रुपये आहे. फोन तीन रंगांमध्ये (आर्क्टिक ब्लू, चारकोल ब्लॅक आणि लस्टर ब्लू) उपलब्ध आहे. जर खरेदीदाराने 20 डिसेंबर रोजी फोनची प्री-ऑर्डर केली, तर त्याला Rs 2,999 किमतीचा Lava ProBuds N11 नेकबँड पूर्णपणे फ्री मिळेल.

Lava X3 Specifications

Lava X3 ला 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे, ज्याला HD+ रिझोल्यूशन मिळते. फोनच्या वरच्या बाजूला वॉटरड्रॉप नॉच आणि तळाशी जाड बेझल्स उपलब्ध राहतील. मागे पिल शेप आकाराचे कॅमेरा मॉड्यूल मिळेल, ज्यामध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आणि मध्यभागी फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. फोनमध्ये Helio A22 प्रोसेसर मिळेल. फोनमध्ये 3GB रॅम + 32GB स्टोरेज आहे.

Lava X3 Camera

Lava X3 ला 8MP प्राथमिक कॅमेरा आणि मागच्या बाजूला आणखी एक VGA लेन्स उपलब्ध आहे. त्यासोबत एलईडी फ्लॅश उपलब्ध. समोर 5MP सेल्फी शूटर मिळेल. फोनमध्ये ब्यूटी आणि अनेक मोड उपलब्ध असतील.

Lava X3 Battery

Lava X3 ला 10W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4000mAh ची दमदार बॅटरी मिळेल. फोन Android 12 Go out of the box वर चालेल. याशिवाय फोनमध्ये 4G VoLTE, USB-C पोर्ट, 3.5mm हेडफोन जॅक, ब्लूटूथ, वायफाय आणि GPS यांचा समावेश आहे.

सरकारी योजना, नोकरी, राशी भविष्य आणि सर्व बातम्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा ग्रुप जॉईन करा.

महत्वाची सूचना व्हाट्सअप मध्ये लॉंडींग स्क्रीन दिसत असल्यास बॅक करून पुन्हा वरील लिंकवर क्लिक करा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Follow us on

Sharing Is Caring: