Hair Dryer News: हेअर ड्रायर बाबत एक लहानशी चूक संपूर्ण घर जळून राख करू शकते

Hair Dryer News: सर्व Hair Dryer users साठी Shocking News आहे. जर तुम्ही हेयर ड्रायर मशीन घरात वापरत असाल तर ही बातमी तुमचे डोळे उघडेल. कारण हेयर ड्रायर बद्दल एक वेगळीच पण महत्वाची बातमी समोर आलेली आहे.

एक लहानशी चूक पूर्ण घर बेचिराख करू शकते. एका पाळीव कुत्र्याच्या मुळे मालकाचे घर आगीच्या आहारी गेलं आणि त्यास कारणीभूत Hair Dryer होते. ब्रिटन मध्ये एका घरामध्ये पाळीव कुत्र्याने चुकून Hair Dryer सुरु केलं ज्यानंतर ब्रिटन मधील त्या घरामध्ये आग लागल्याचे बोलले जात आहे. जेव्हा याबद्दल फायर सर्विसला कळवण्यात आलं त्यानंतर आग विझवण्यात आली.

पाळीव कुत्र्याने Hair Dryer ऑन केला

24 डिसेंबर रोजी संध्याकाळी ब्रिटन मधील एसेक्स फायर सर्व्हिसला हॉकली येथे बोलावण्यात आले होते. एसेक्स फायर सर्व्हिसच्या अनुसार एक महिला जेव्हा घरी परतली तेव्हा पाहिले कि संपूर्ण घर धुराने भरलेलं आहे आणि तिचा पाळीव कुत्रा समोरच्या दारा बाहेर बसलेला आहे.

A small mistake with the hair dryer can burn down the entire house

अग्निशमन अधिकार्‍यांचा विश्वास आहे की कुत्र्याने बेडवर उडी मारली असेल आणि महिलेने बेडवर ठेवलेले Hair Dryer त्याच्याकडून चुकून ऑन झालं असेल. ज्यानंतर बेडला आग लागली आणि बेडरूम मध्ये धूर झाला. ज्यानंतर अग्निशमन अधिकारी आले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.

गॅरी शिन यांनी लोकांना आवाहन केलं की लोकांनी अश्या चुका करू नयेत. ते पुढे म्हणाले “तुम्ही हेअर ड्रायर आणि स्ट्रेटनरसारखे कोणतेही विद्युत उपकरण वापरून झाल्या नंतर, कृपया ते अनप्लग करा आणि सुरक्षित ठिकाणी ठेवा. घरमालकाला स्वप्नातही वाटले नाही की तिचा कुत्रा हेअर ड्रायर चालू  करू शकतो.”

अशी घटना टाळण्यासाठी Hair Dryer, स्ट्रेटनर आणि इस्त्री सारखी उपकरणे काम झाल्यावर अनप्लग करून सुरक्षित जागी ठेवणे चांगले. कारण जरी तुमच्याकडे पाळीव प्राणी नसला तरी लहान मुले किंवा कधी कधी एखाद्या व्यक्तीचा बटनाला धक्का लागून बटन ऑन होऊ शकते. ज्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

सरकारी योजना, नोकरी, राशी भविष्य आणि सर्व बातम्या व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा ग्रुप जॉईन करा.

महत्वाची सूचना व्हाट्सअप मध्ये लॉंडींग स्क्रीन दिसत असल्यास बॅक करून पुन्हा वरील लिंकवर क्लिक करा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

Follow us on

Sharing Is Caring: