बिना रगडता बिना मेहनत तांब्याची भांडी चुटकीसरशी चमकदार करायची तर हा उपाय करा

आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये तांब्याची भांडी असतातच ते वातावरणाने किंवा ठेवणीत ठेवून काळे पडतात. त्यांना चमकदार करून नवीन असल्या सारखी दिसावीत असे सगळ्यांना वाटते. त्यासाठी आपण अनेक प्रयत्न देखील केले असतील पण आज जी पद्धत आम्ही तुम्हाला सांगत आहोत ती एकदा नक्की वापरून पहा.

तांब्याची भांडी चमकदार करण्यासाठी एक टेबलस्पून टोमॅटो केचप, अर्धा चमचा खाण्याचा सोडा (खाण्याचा सोडा यावर जमा झालेली घाण आणि मळ काढतो). आता यामध्ये अर्धा लिंबाचा रस मिक्स करा. लिंबाचा रस देखील तांब्याचे भांडे चमकदार करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडतो. तसेच टोमॅटो देखील भांडे क्लीन करतो या तिन्ही पदार्थाचे मिश्रण बनवा.

आता या मिश्रणाचा जाड थर तांब्याच्या भांड्यावर लावा. यास लावल्या नंतर 15 ते 20 ते भांडे तसेच राहू द्या. 15 मिनिटा नंतर पेस्ट सुकेल. आता यास पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. बिना मेहनत करताच भांडे चमकदार दिसेल. हि सोप्पी पद्धत वापरून आपण कोणतेही तांब्याचे भांडे चमकदार बनवू शकतो.

तांब्याची भांडी चमकदार करण्याची दुसरी पद्धत

तांब्याची भांडी चमकदार करणे हे म्हणजे मोठे कठीण काम आहे असे सगळ्यांना वाटते. पण खालील ट्रिक समजल्यावर आपल्याला तांब्याची भांडी चमकदार करणे अगदी सोप्पे वाटेल. चला जाणून घेऊ काय आहे ही पद्धत ज्यामुळे तांब्याची काळी भांडी देखील चुटकीसरशी चमचम करतात.

व्हिनेगर आणि मीठ यांचा वापर या पद्धती मध्ये केला जातो. जर आपल्या घरामध्ये व्हिनेगर नसेल तर आपण मीठ आणि लिंबू वापरून तांब्याची भांडी स्वच्छ करू शकता. चला तर जाणून घेऊ 5 मिनिटात तांब्याची भांडी चमकदार कशी करता येतात.

कोणत्याही स्क्रबरला व्हिनेगर मध्ये बुडवून तांब्याच्या भांड्यावर व्हिनेगर भांड्यावर लावा. यास हलक्या हातांनी लावायचे आहे त्यानंतर स्क्रबर मीठामध्ये बुडवून मीठ देखील भांड्याला लावावे. जसजसे मीठ आपल्या भांड्याला टच करेल आपले भांडे स्वच्छ होत जाईल.

यासाठी आपल्याला कोणत्याही जास्त मेहनतीची गरज नाही. आपल्याला हे सगळं हलक्या हातांनी करायचे आहे. नंतर पाण्याने स्वच्छ धुवायचे आहे.

जर आपल्या घरी व्हिनेगर उपलब्ध नसेल तर आपण लिंबू मधोमध कापून त्याचे दोन तुकडे करा आणि त्यानंतर एक तुकडा मीठामध्ये बुडवून त्यास मीठ लावून त्याने भांड्याला हलक्या हाताने रफ करा लिंबावर लागलेले मीठ आणि लिंबातील रस यामुळे भांडे स्वच्छ होईल. त्यानंतर पाण्याने भांडे स्वच्छ धुवून घ्या. अश्या प्रकारे आपले काळे तांब्याची भांडी चमकदार होतील. ते देखील कोणतीही अतिरिक्त मेहनत न करता.