food

चहा चपाती खाणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे का? जाणून घ्या

अनेक आहारतज्ज्ञ मानतात कि सकाळचा नाश्ता पोटभरून करावा, त्यानंतर दुपारचे जेवण आणि रात्री कमी अन्न खावे असे केल्याने आरोग्य चांगले राहते.

हल्ली बरेचसे लोक सकाळी कामाच्या घाई मध्ये आपला सकाळचा नाश्ता टाळतात किंवा घाईगडबडीत रेडी टू इट पदार्थ खातात. पण बऱ्याच घरामध्ये अजूनही सकाळचा झटपट नाश्ता म्हणून चहा आणि चपाती (पोळी) खाल्ली जाते. पण आहार तज्ञ काय म्हणतात याबद्दल चला पाहू.

आहार तज्ञ काय म्हणतात.

आहार तज्ञांच्या मते चपाती आणि चहा खाणे आरोग्यदायी नाही. चहा चपाती एकत्र खाण्यामुळे मिळणारे पोषकद्रव्य अतिशय कमी असतात.

सकाळी आपण जो नाश्ता करतो त्यामधून दिवसभर आपल्या शरीराला दिवसभर पुरेल एवढी उर्जा मिळेल असा नाश्ता केला पाहिजे. कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन घटक मुबलक आपल्याला सकाळच्या नाश्त्यामध्ये मिळाले पाहिजेत. परंतु चहा चपाती खाण्यामुळे आपली ही आवश्यकता पूर्ण होत नाही. चहा चपाती आपली आयर्न, कार्बोहायड्रेट आणि कैल्शियमची गरज पूर्ण करू शकत नाहीत.

हा चुकीचा कॉम्बिनेशन आहे

चहा मध्ये कैफिन हा घटक असतो त्यामुळे दिवसाची सुरुवात चहाने करणे आरोग्यदायी नाही. खरतर कोणताही पदार्थ चहा बरोबर घेणे फायद्याचे नाही. चहा आणि चपाती या कॉम्बिनेशनने कैल्शियम आणि आयर्न शरीरात मुबलक प्रमाणत शोषले जात नाही. त्यामुळे शरीराला आवश्यक उर्जा आणि पोषण मिळत नाही.

हेल्दी नाश्ता कोणता घ्यावा

चहा चपाती खाण्या एवजी तुम्ही भाजी चपाती किंवा दुध चपाती, दही चपाती, दुध, पनीर किंवा जर तुम्ही अंड खालले तरी चालेल.

उपमा, अप्पम, इडली सांबार हे सकाळी नाश्त्यासाठी उत्तम पदार्थ आहेत.


Show More

Related Articles

Back to top button