हुबेहूब आपल्या आई सारखी दिसते ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, बहिणीच्या बर्थडे निमित्त शेयर केला थ्रोबैक फोटो

0
21

थ्रोबैक फोटो पाहणे लोकांना आवडतात. जर काही विशेष कारण असेल तर स्टार्स आपले जुने फोटो सोशल मीडिया वर शेयर करतात ज्यांना वायरल होण्यास वेळ लागत नाही. आता एक अश्याच प्रसिद्ध अभिनेत्रीचा फोटो समोर आला आहे जीने आपल्या अभिनयाची छाप फिल्म इंडस्ट्रीवर सोडली आहे.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून तब्बू आहे. 4 नोव्हेंबर रोजी तब्बूने आपला 48 वा बर्थडे साजरा केला. या निमित्त बॉलिवूडच्या इतर अनेक स्टार्सनी तिला शुभेच्छा दिल्या. तब्बूची बहीण फरहा नाज ने इंस्टाग्राम स्टोरी वर लहानपणीचा एक फोटो शेयर केला ज्यामध्ये दोघी बहिणी दिसून येत आहेत. या फोटो मध्ये दोन बहिणी सोबत त्यांची आई देखील आहे ज्यामध्ये तब्बू हुबेहूब आपल्या आई सारखी दिसते हे दिसून येत आहे.

1980 साली फिल्म ‘बाजार’ मधून तब्बू ने आपल्या करियरची सुरुवात केली होती. तिने वेगवेगळ्या भूमिका केल्या आणि प्रसिद्ध झाली. फिल्मी बैकग्राउंड असल्यामुळे ती पहिल्या पासून फिल्म इंडस्ट्रीकडे आकर्षित होती. हेच कारण होते कि अगदी कमी वयात तिला फिल्म मध्ये एंट्री मिळाली होती.

देव आनंद यांनी फिल्म ‘हम नौजवान’ मध्ये 1985 मध्ये संधी दिली होती. त्यावेळी तब्बूचे वय फक्त 14 वर्ष होते. या कमी वयात देखील तिने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडली होती. ज्यानंतर तिने पुन्हा कधीही मागे वळून पाहिले नाही आणि यश मिळवत गेली.