Connect with us

हार्ट अटैक येण्याच्या एक महिना अगोदर शरीर देतो हे 6 संकेत, जाणून घ्या नाहीतर पश्चाताप करावा लागेल

Health

हार्ट अटैक येण्याच्या एक महिना अगोदर शरीर देतो हे 6 संकेत, जाणून घ्या नाहीतर पश्चाताप करावा लागेल

हार्ट अटैक बद्दलच्या बातम्या नेहमीच आपल्याला मिळत असतात. कधी न्यूज चैनलवर एखाद्या सिलेब्रेटी हार्ट अटैक आल्याने मृत्यू झाल्याची हि बातमी असते तर कधी आपला एखादा नातेवाईक किंवा मित्र असतो. त्यातही आता तरुण लोकांचाही हार्ट अटैकने मृत्यू होत असल्याने आपल्याला आश्चर्य वाटते. पण हा हार्ट अटैक येण्याच्या अगोदर आपले शरीर आपल्याला काही संकेत देत असतात. ज्यांना वेळीच ओळखले गेल्यास आपण सावधानी घेऊ शकतो. चला पाहू कोणते संकेत शरीर हार्ट अटैक येण्या अगोदर देतो. परंतु त्यापूर्वी आपण हार्ट अटैक येण्यासाठी कोणती कारणे कारणीभूत ठरतात ते पाहू.

हार्ट अटैक येण्याची 5 मुख्य कारणे आहेत.

  1. जेनेटिक
  2. फ्रुट्स आणि वेजिटेबल कमी खाणे
  3. व्यायाम न करणे
  4. हाई बीपी किंवा डायबीटीज
  5. स्मोकिंग

पण लक्षात ठेवा हार्ट अटैक अचानक येत नाही. हार्ट अटैक येण्या अगोदर बॉडी काही संकेत देते. जर तुम्हाला या संकेतांची माहिती असेल तर तुम्ही वेळीच उपाय करू शकता. तुमच्या माहितीसाठी हार्ट अटैक येण्याच्या एक महिना अगोदर पासून बॉडी काही महत्वाचे संकेत देते. हार्ट अटैक येण्याच्या एक महिना अगोदर पासून तुम्हाला यांची जाणीव होण्यास सुरुवात होते पण अत्यंत कमी लोक यांच्याकडे लक्ष देतात.

हार्ट अटैक येण्याच्या अगोदर हे संकेत मिळतात

थकवा

जर तुम्हाला असामान्य थकवा जाणवत असेल तर सावध राहा. हे हार्ट अटैक येण्याचा एक महत्वाचा लक्षण आहे. बहुतेक महिलांमध्ये हे लक्षण पाहण्यात येते. असामान्य थकवा म्हणजे अगदी लहान काम केल्याने देखील थकवा येणे जसे अंथरून व्यवस्थित केल्यावर किंवा अगदी अंघोळ केल्यावर देखील थकवा जाणवणे.

पोटदुखी

तसे पाहता पोटदुखी हि एक सामान्य समस्या आहे पण जर तुम्हाला नेहमी पोटदुखी, सुजणे, पोट खराब होणे इत्यादी समस्या होत असेल तर त्यास हलक्या मध्ये घेऊ नका. हे लक्षण महिला आणि पुरुष दोघांमध्ये सारख्याच प्रमाणत दिसून येते.

श्वासात कमी

श्वासात कमी मुळे हार्ट अटैक होऊ शकतो. जर तुम्हाला दीर्घकाळा पासून असे वाटत आहे कि तुम्हाला आवश्यक प्रमाणात हवा मिळत नाही आहे, चक्कर येते आणि श्वास घेताना त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांच्या सोबत चर्चा करा.

अनिद्रा

अनिद्रा देखील हृदयरोगाचा झटका येण्याची शक्यता वाढवतो. हे लक्षण महिलांमध्ये जास्त पाहण्यात येते.

केस गळणे

केस गळणे हृद्य रोगाची मोठी जोखीम मानली जाते. साधारणपणे हे लक्षण 50 टक्के पेक्षा जास्त पुरुषात दिसतात पण काही महिलांमध्ये देखील पाहण्यात येतात.

छती दुखणे

छाती मध्ये वेदना फक्त हार्ट अटैक आल्यावरच होतात असे नाही. वेगवेगळ्या तीव्रतेने आणि रूपाने छाती दुखते. पण हे लक्षण जर पुरुषा मध्ये दिसले तर हे हार्ट अटैक सोबत संबंधित असू शकतात. फक्त 30 टक्के महिला या लक्षणामुळे प्रभावित होतात.

मित्रानो तुम्हाला हि माहिती महत्वाची आणि उपयोगी वाटली असेल तर पोस्ट शेयर आणि लाईक करण्यास विसरू नका ज्यामुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांना देखील हि माहिती मिळेल आणि आपल्या जवळील माणसांचे हार्ट अटैकमुळे मृत्यू झाल्याची बातमी आपल्याला मिळण्याची शक्यता कमी करता येईल.

अशीच महत्वाची माहिती तुम्हाला नेहमी आपल्या फेसबुकवर मिळवायची असेल तर आमचे पेज लाईक करा. धन्यवाद.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top