‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत लवकरच घडणार ‘ही’ एक अत्यंत वाईट घटना

हल्लीच स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेमध्ये कारस्थानी कारभाऱ्याना शिक्षा देण्यात आल्या व त्यानंतर सोयरा मातोश्रींना महाराजांनी विचारले कि तुम्ही कारभाऱ्यांना आपली मूकसंमती का दिली, तुम्ही त्यांना थांबवले का नाही. तसेच सोयरा मातोश्रींना नजरकैद देत असल्याचे देखील सांगितले.

सोयरा मातोश्रींना घडलेल्या घटनेचा पश्चाताप होतोय. त्यांच्या हातून एवढी भलीमोठी चूक कशी झाली हे त्यांना समजत नाही आहे या बद्दल ते स्वतः ला अनेक प्रश्न विचारत आहेत. तसेच आपण संभाजी महाराजांना एक ओळीचे पत्र न लिहिता संपूर्ण सावध करायला पाहिजे होते याची खंत वाटत आहे त्यामुळे त्यांनी आता आपल्या महालाचा दरवाजा बंद केला आहे.

महाराणीसाहेब येसूबाई आणि इतर लोक सोयरा मातोश्रींना महालाचा दरवाजा उघडण्यासाठी विनवणी करत आहे परंतु मातोश्री कोणाचेही ऐकत नाही आहेत.

सोयरा मातोश्रींना आपला भूतकाळ आठवत आहे त्यांचे आणि शंभूराज्यांच्या गोड आठवणी त्यांना आठवत आहेत. शंभूराज्यांनी त्यांच्यावर केले निर्मळ प्रेम त्यांना आठवत आहे त्यामुळे त्या आता पश्चातापाची अग्नी मध्ये होरपळत आहेत.

सोयराबाईंना भेटण्यासाठी त्यांचे भाऊ हंबीरमामा येतात तरी ते प्रथम दरवाजा उघडत नाहीत परंतु हंबीरमामा जेव्हा म्हणतात कि आम्ही तुमची शिव छत्रपतींच्या समाधीवर तुमची तक्रार करण्यास जात आहोत तेव्हा ते दरवाजा उघडून त्यांना महाला मध्ये घेतात. तेथे हंबीरमामा देखील सोयराबाईंना सुनावतात आणि आता मुक्कम हलवण्याची वेळ आल्याचे सांगतात.

आता मालिकेमध्ये ती घटना घडणारच. पश्चातापाच्या अग्नीत होरपळणाऱ्या सोयराबाई प्राण त्याग करतात. त्यांचा मृत्यू होतो. सोयरा मातोश्रींच्या मृत्यू नंतर रायगड हादरतो. संभाजी महाराजांना आपण मातोश्रींना जास्त बोललो म्हणून असे घडले याची खंत वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here