सुप्रियाताई सुळे यांची मुलगी दिसते बॉलीवूड अभिनेत्रींपेक्षा सुंदर

महाराष्ट्रातील महिला नेत्यांचे नाव सांगा असे जर आपण कोणालाही विचारलं तर सुप्रियाताई सुळे यांचे नाव सर्वप्रथम घेतलं जात. कारण सुप्रियाताई या एक लोकप्रिय महिला नेत्या आहेत. सुप्रियाताई या शरद पवार यांच्या कन्या आहेत असं असले तरी त्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात देखील आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सुप्रियाताई बारामती लोकसभा मतदार संघातून तीन वेळा निवडून आल्या आहेत. सुप्रियाताई लोकांचे प्रश्न लोकसभेत प्रभावीपणे मांडतात आणि त्याचा पाठपुरावा करतात. त्यामुळे त्या नेहमी चर्चेत असतात. सुप्रियाताई नेहमी सामान्य लोकांसोबत संवाद साधतात आणि त्यांचे प्रश्न समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.

लोकांना सुप्रियाताईंच्या कुटुंबा विषयी जाणून घेण्याची देखील उत्सुकता नेहमी असते. परंतु सुप्रियाताईंचे कुटुंब नेहमीच राजकारणा पासून दूर राहील आहे. सुप्रियाताईंचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्या नंतर त्यांचा विवाह सदानंद सुळे यांच्या सोबत झाला.

सदानंद सुळे आणि सुप्रियाताई यांची भेट एका कौटुंबिक कार्यक्रमा दरम्यान झाली होती. त्यांनी एकमेकांना पसंत केलं आणि नंतर त्यांनी सहा महिने एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ जाऊ दिला नंतर माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने सुप्रियाताई आणि सदानंद सुळे यांचा विवाह झाला.

आपल्या माहितीसाठी सुप्रियाताईंचे पती सदानंद सुळे हे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे भाचे आहेत. त्यामुळे बाळासाहेबांनी हा विवाह होण्यासाठी पुढाकार घेतला होता. आपल्याला माहीत आहेच कि शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे राजकीय विरोधक असले तरी त्यांचे कौटुंबिक नाते मैत्रीपूर्ण होते.

सुप्रियाताई सुळे यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन आपत्य आहेत. यामध्ये मुलगी रेवती सुळे ही थोरली पुत्री असून मुलगा विजय सुळे हा धाकटा पुत्र आहे. रेवती सुळे चा जन्म 30 ऑक्टॉबर 1998 रोजी झाला असून ती आता 21 वर्षांची आहे. रेवती बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा जास्त सुंदर दिसते.

तर सुप्रियाताईंचा मुलगा विजय हा 16 वर्षांचा आहे. रेवतीचे वय 18 वर्ष पूर्ण झालेलं असल्याने तिला मतदानाचा हक्क आहे. त्यामुळे ती निवडणुकी दरम्यान मतदान करण्यास जाते आणि तेव्हाचे तिचे फोटो आपल्याला पाहण्यास मिळतात. तर विजय अजून 18 वर्षांचा झाला नसल्याने त्यास अजूनही मतदानाचा अधिकार नाही आहे.

सुप्रियाताई आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून आपल्या कुटुंबियांसोबतचे फोटो शेयर करत असतात. सुप्रियाताईंनी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली असल्याचं बोललं जाते.