food

शरीरात रक्ताची कमी झाली आहे तर काळजी करू नका हे उपाय करा

रक्त वाढीसाठी काय खावे : आज आपण येथे काही सुपर फूड बद्दल माहिती घेणार आहोत ज्यांच्यामुळे रक्ताची कमी जलदपणे दूर होते कारण यामध्ये आहे मुबलक आयरन. येथे आपण पाहणार आहोत कोणकोणते आहेत हे फूड आणि या मधून आपल्याला किती आयरन मिळते.

डार्क चॉकलेट : यामध्ये १०० ग्राम मध्ये १७ मिग्रा आयरनचे प्रमाण आहे. हे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा मिल्कशेक बनवून पिऊ शकता.

राजमा : १०० ग्राम राजमा मध्ये ८.२ मिग्रा आयरनचे प्रमाण असते. राजमा तुम्ही उकळवून भाजी बनवू शकता किंवा सलाड मध्ये मिक्स करून खाऊ शकता.

वटाणे : १०० ग्राम वाटाण्यामध्ये २.५ मिग्रा आयरन असतो. वाटाणा तुम्ही भाजी बनवून किंवा असेच खाऊ शकता.

पालक : १०० ग्राम पालक मध्ये ८ मिग्रा आयरन असते. भाजी किंवा ज्यूस बनवून तुम्ही पालक घेऊ शकता.

सोयाबीन : १०० ग्राम सोयाबीन मध्ये १५.७ मिग्रा आयरन असते. याची तुम्ही भाजी बनवू शकता किंवा उकळून सलाड मध्ये टाकू शकता.

बीट : १०० ग्राम बीट मध्ये २.७२ मिग्रा आयरन असते. सलाड किंवा ज्यूस बनवून तुम्ही हे घेऊ शकता.

ओट्स : १०० ग्राम ओट्स मध्ये ४.७ मिग्रा आयरन असते. दुधाच्या सोबत किंवा भाजीत मिक्स करून तुम्ही हे घेऊ शकता.

भोपळ्याच्या बिया : १०० ग्राम मध्ये  १५ मिग्र आयरनचे प्रमाण यामध्ये असते. यांना असेच खावे.

चिकन : १०० ग्राम चिकन मध्ये १३ मिग्रा आयरन असते. ग्रिल किंवा रोस्ट करून खाऊ शकता.

नट्स : १०० ग्राम नट्स मध्ये ६.१ मिग्रा आयरन असते. यांना तुम्ही असेच खाऊ शकता किंवा दुधाच्या सोबत देखील घेऊ शकता.

तुम्हाला रक्त वाढीसाठी काय खावे हे आता समजले असेलच. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये लिहा.


Show More

Related Articles

Back to top button