health

तुम्हाला माहीत नसतील टिश्यू पेपर चे हे ब्युटी ट्रिक्स, आत्ताच जाणून घ्या अन्यथा पश्चाताप करावा लागेल

टिश्यू पेपर एक अशी वस्तू आहे जी जवळपास प्रत्येक महिलेच्या बैंग किंवा पर्स मध्ये असते आणि त्यांच्या जवळ या वस्तूची कमी नसते. याचा वापर आपण पर्सनल हाईजिन सोबतच दुसऱ्या कामासाठी देखील करू शकतो.

आपण आता पर्यंत मेकअप रिमूव्ह करण्यासाठी किंवा पसरलेली लिपस्टिक किंवा काजळ-आइलाइनर काढण्यासाठी याचा वापर केला असेल. पण या व्यतिरिक्त टिश्यू पेपर तुमच्या अनके कामी येऊ शकतो.

पण यांच्या संबंधित ब्युटी ट्रिक्स समजून घेण्याच्या अगोदर तुम्हाला यागोष्टीची काळजी घेण्याची गरज आहे कि तुम्ही चांगल्या टिश्यू पेपरचा वापर करावा. रंगीत नव्हेतर पांढऱ्या टिश्यू पेपरचा वापर करावा. काही टिश्यू पेपर तर न्यूट्रल पीएच लेवल सोबत येते जे त्वचेसाठी हानिकारक नसते.

तुम्ही लो क्वालीटीच्या जागी प्रीमियम ब्रांड ट्युशी पेपर खरेदी करावा कारण तुम्ही याचा वापर आपल्या चेहऱ्यावर करणार आहेत. चला पाहू टिश्यू पेपर संबंधित ब्युटी ट्रिक्स जे तुमचे जीवन सोप्पे बनेल.

पील ऑफ मास्क

एक बाउल मध्ये 1 अंड्याचा सफेद हिस्सा घ्या, त्यामध्ये लिंबाच्या रसाचे 5 थेंब आणि 5 थेंब बादाम तेल टाकावे. या सगळ्यांना मिक्स करून व्यवस्थित मिक्स करा. एक ब्रशच्या मदतीने याचा एक कोट चेहऱ्यावर लावा. आता एक टिश्यू पेपर घेऊन चेहरा झाकावा आणि हलक्या हाताने दाबावे. आता या मास्क वर ब्रशच्या मदतीने अजून दोन कोट लावा. आता 20 मिनिट सुकून द्या. जेव्हा तुम्हाला वाटेल कि मास्क आपल्या चेहऱ्यावर टाईट होत आहे तेव्हा एका झटक्यात यास काढावे. हे एग टिश्यू पेपर मास्क तुमच्या चेहऱ्या वरील घाण स्वच्छ करेल आणि त्वचा चमकदार बनवेल.

नार्मल लिपस्टिकला बनवतो माहित मैट

आपण आपली रेगुलर लिपस्टिक अप्लाय करा. त्यानंतर आपल्या ओठावर टिश्यू पेपर ठेवून दाबा. आता ब्रशच्या मदतीने हलका ट्रान्सलुसेन्ट पावडर ओठावर लावा. हि ओठाला मैट लूक देईल.

आयशेडोमुळे खराब नाही होणार मेकअप

तुमच्या सोबत कदाचित अनेक वेळा घडले असेल कि आयशेडोचे कण तुमच्या गालांवर येऊन पडले असतील ज्यामुळे तुमचा मेकअप बिघडला असेल. पण आता एका सोप्प्या ट्रिक ने तुम्ही या समस्ये पासून वाचू शकता. जेव्हा तुम्ही तुमचा आय मेकअप कराल तेव्हा आपल्या गालांवर टिश्यू पेपर ठेवा. जेव्हा मेकअप पूर्ण होईल तेव्हा टिश्यू पेपर बाजूला करा. मेकअप बिलकुल खराब होणार नाही.

ब्लैकहेड्ससाठी पोर स्ट्रिप्स

आपल्या चेहऱ्यावर गरम पाण्याने भिजलेला टॉवेल ठेवा, यामुळे स्किन पोर्स उघडतील. आता एक चमचा अंड्याचा पांढरा भाग आणि त्यामध्ये टी ट्री ऑइल चे पाच थेंब टाकावे. आता टिश्यू पेपरला स्ट्रीप प्रमाणे कापावे. आपल्या नाकावर या मास्कचा एक हलका कोट लावा. आता यावर टिश्यू पेपरच्या स्ट्रीप लावा आणि यावर पुन्हा एकदा मास्कचा दुसरा कोट लावा. 15 मिनिट यास सुकवा आणि बैंड-एड प्रमाणे यास काढावे. याच सोबत तुमचे ब्लैकहैड निघून जातील.

आयरन करताना केसांना जळण्यापासून वाचवते

ही एक अत्यंत उपयोगी ट्रिक आहे. आपण यास वापरण्या अगोदर कर्लिंग रोड किंवा स्ट्रेटनरला टिश्यू पेपर मध्ये लपेटा. असे केल्याने केसांना हिट मुळे होणारे नुकसान कमी होईल आणि सोबतच केसांना जळण्यापासून वाचवते.

वर दिलेल्या माहितीची सत्यता आमच्या कडून पडताळण्यात आलेली नाही तसेच वरील माहिती सत्य असल्याचा कोणाही दावा आम्ही करत नाही याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. वरील माहिती एका प्रसिद्ध वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पोस्टचा मराठी अनुवाद आपल्या मनोरंजनासाठी येथे प्रकाशित करण्यात आला आहे.

वाचकांनी वरील माहितीचा वापर प्रत्येक्ष वापर करण्याच्या अगोदर सत्यता पडताळून घ्यावी ही विनंती. marathigold.com यापासून होणाऱ्या कोणत्याही प्रत्येक्ष आणि अप्रत्यक्ष फायद्यास किंवा नुकसानीस जबाबदार राहणार नाही.

Show More

Related Articles

Back to top button
Close