moneyPeopleviral

वीजेचे बिल अर्धे करणारा पंखा, EMI वर देत आहे सरकार

उन्हाळा सुरू झाला आहे. घरे, दुकाने, ऑफिसमध्ये पंखे सुरू असतात. काही ठिकाणी एसी-कुलर सुरु आहेत. त्यामुळे अर्थातच वीजेच बिल वाढू शकते. पण तुम्ही याचा योग्य पध्दतीने वापर करुन वीजेचे बिल कमी करु शकता. बाजारात असे अनेक पंखे उपलब्ध आहेत ज्याचा वापर करुन तुम्ही तुमचे वीजबिल कमी करु शकता. जर हे पंखे बाजारात उपलब्ध नसतील तर सरकारच्या एका योजनेचा फायदा उचलून तुम्ही बिल कमी करु शकता. उर्जा बचतीसाठी हा पंखा सर्वोत्तम आहे. हा सरकारच्या ऊर्जा बचत योजनेतंर्गत तुम्ही जवळपास अर्ध्या किमतीत खरेदी करु शकता. हा पंखा तुम्हाला EMI वर मिळू शकतो.

आम्ही याबाबतची योजना तुम्हाला सविस्तरपणे सांगत आहोत.

कसे आहेत हे पंखे

एक रेग्यूलर छताचा पंखा 75-80 वॅट वीजेचा वापर करतो. ब्‍यूरो ऑफ एनर्जी इफिशन्सीने (बीईई) छताला लावलेल्या पंख्यासाठी स्टार रेटिंग सुरु केली आहे. त्यासाठी केवळ 45-50 वॅट वीजेचा वापर होतो. पण रेग्यूलर पंख्यापेक्षा हा पंखा कमी हवा देतो अशा तक्रारी आल्यानंतर बीईईने सुपर इफिशंट पंखे लॉन्‍च केले आहेत. बीईई 5 स्‍टार रेकिंग दिली आहे. या पंख्याला केवळ 30-35 वॅट वीज लागते.

अर्धी आहे किंमत

सुरुवातीला या पंख्याची किंमत रेग्यूलर पंख्यापेक्षा दुप्पट होती. बाजारात रेग्यूलर पंखा 1000 रुपयांच्या आसपास मिळतो.

कुठे मिळतील हे पंखे

बीपीसीएल, एचपीसीएल, आईओसीएल आणि पोस्‍ट विभागही हेपंखे विकत आहे. दिल्लीत हे पंखे वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तुम्ही वर सांगितलेल्या कंपन्यांकडूनही ते थेट खरेदी करु शकता. पेट्रोलियम कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवरही ते उपलब्ध आहेत.

कसे वाचेल बिल

– रेग्युलर पंखे 75 वॉटचे असतात. तर सुपर एफिशिएंट पंखा हा 35 वॉटचा आहे.

– रेग्युलर पंखा वर्षात 180 यूनिट वीज खर्च करतो., तर सुपर एफिशिएंट पंख्याला केवळ 84 यूनिट वीज लागते.

– जर पांच रुपए प्रति यूनिट दर असेल तर वर्षाला 900 रुपये लागतील, तर सुपर एफिशिएंट पंख्याचे बिल केवळ 420 रुपये येईल.


Show More

Related Articles

Back to top button