foodhealth

या बिया खाण्यामुळे बॉडी रिपेयर होते, केसांची वाढ, हृद्य निरोगी आणि बरेच फायदे मिळतात

आपल्या शरीरावर नकळत अनेक परिणाम होत असतात हे परिणाम कधी चांगले असतात तर कधी वाईट असतात. आजकालच्या खराब वातावरणाचा आणि जीवनशैलीचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम जास्त होत असतो. त्यामुळे आपल्या आहारा मध्ये काही बदल करून किंवा काही वस्तूंचा समावेश करून आपण आपल्या शरीराची काळजी घेऊ शकतो. तुम्हाला कदाचित माहित नसेल परंतु सूर्यफुलाच्या बिया आणि तेल आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे आपल्याला अनेक आजारा पासून संरक्षण मिळते. चला पाहू याबद्दल सविस्तर माहिती.

सूर्यफुलाच्या बियांमध्ये विटामिन ई तसेच इतर खनिज पदार्थ असतात, जे आपल्याला डोक्या पासून ते पाया पर्यंत फायदा पोहचवतात. या बिया खाण्यास स्वादिष्ट असण्या सोबतच पोषण देखील देतात आणि पोट देखील भरते. सूर्यफुलाच्या बिया तुम्हाला फूड स्टोर्स मध्ये सहज उपलब्ध होतील. यांना खाण्यामुळे हार्ट अटैकची शक्यता कमी होते. कोलेस्टेरॉल कमी होते, त्वचेमध्ये चमक येते तसेच केसांची वाढ होते. याव्यतिरिक्त अजूनही अनेक फायदे आहेत. चला आपण ते फायदे देखील पाहूया.

सूर्यफुलाच्या बिया (Sunflower Seed) चे फायदे

हृद्य निरोगी ठेवतो : यांच्या मध्ये विटामिन सी असते जे हृदयरोग दूर ठेवण्यासाठी मदत करतो. सोबतच यामध्ये असलेले विटामिन ई कोलेस्टेरॉलला रक्ताच्या धमन्यांमध्ये जमू देत नाही. त्यामुळे हार्ट अटैक आणि स्ट्रोक यांची भीती कमी होते. एक चातर्थांस कप सूर्यफुलाच्या बिया 90 टक्के रोजचे विटामिन ई देतो.

कोलेस्टेरॉल कमी करतो : यामध्ये मोनो आणि पोलीसैच्युरेटेड फैट्स असतात जे चांगले फैट्स मानले जातात. हे खराब कोलेस्टेरॉल कमी करण्याचे काम करतात. याच सोबत यामध्ये भरपूर फाइबर देखील असते जे कोलेस्टेरॉल कमी करते.

पोट व्यवस्थित ठेवते : बियांमध्ये भरपूर फाइबर असते जे बद्धकोष्ठता दूर करते.

कैंसर पासून बचाव : यामध्ये विटामिन ई, सेलीयम आणि कॉपर असते ज्यामध्ये एंटीऑक्सीडेंट गुण असतात. रिसर्च मध्ये सांगितले गेले आहे कि हे पोट, प्रोस्ट्रेट आणि ब्रेस्ट कैंसर पासून रक्षण करते.

त्वचेवर चमक : सूर्यफुलाच्या बियातील तेल त्वचेमध्ये ओलावा टिकवून ठेवतो तसेच बैक्टीरिया पासून संरक्षण करतो.

हाडांची मजबुती : यामध्ये मैग्नीशियम चे परमान जास्त असते जे हाडांना मजबूत करते. त्याचा सोबत हे सांध्यांना लवचिकता आणि मजबुती देते.

एक्ने आणि त्वचे संबंधित आजार दूर करतो : सूर्यफुलाच्या बियांच्या तेलामध्ये फैटी एसिड असते जे त्वचेला बैक्टीरिया पासून वाचवून एक्ने होण्यापासून वाचवतो. असेही मानले जाते कि सूर्यफुलाचे तेल एक्जिमा आणि डर्मेटाइटिसच्या आजारा पासून वाचवते.

स्ट्रेस आणि माइग्रेन : हे तुमचे डोके शांत ठेवते. यामध्ये असलेले मैग्नीशियम डोक्याच्या नसा शांत ठेवतो तसेच स्ट्रेस आणि माइग्रेन पासून सुटका देतो.

केस गळणे थांबवणारे उपाय - Hair Fall Tips in Marathi

केसांची वाढ : या बियांमध्ये जिंक असते जे तुमच्या केसांची वाढ करेल. परंतु जास्त जिंक सेवन केल्यामुळे केसांच्या गळण्याची समस्या वाढू शकते. यामध्ये असलेले विटामिन ई डोक्यामध्ये ब्लड सर्कुलेशन करून केसांची वाढ करण्यास मदत करतो.

संधिवात पासून बचाव : जे लोक संधिवातच्या आजाराला घाबरतात त्यांच्यासाठी सूर्यफुलाचे तेल उत्तम आहे. हे तेल rheumatoid arthritis थांबवण्यास मदत करते. त्यामुळे ज्यांना संधिवात आहे त्यांनी सूर्यफुलाचे तेल वापरले पाहिजे.

अस्थमा आणि पोटाच्या कैंसर पासून रक्षण : सूर्यफुलाच्या तेलामध्ये बनवलेल्या पदार्थामध्ये इतर तेलापेक्षा जास्त विटामिन ई असते. त्यामुळे तुम्ही आपल्या आहारामध्ये या तेलाचा समावेश केल्यास अस्थमा आणि पोटाच्या कैंसर पासून वाचू शकता.

बॉडी रिपेयर करतो : सूर्यफुलाच्या तेलामध्ये प्रोटीन असते. जे आपल्या शरीराच्या निर्माण आणि देखभाल तसेच हार्मोन आणि एंजाइमांच्या उत्पादनासाठी मदत करतो. आपल्या शरीराला उच्च प्रमाणात प्रोटीनची गरज असते. कारण शरीर प्रोटीन साठवून ठेवू शकत नाही त्यास वापरले जाते आणि या गरजेला सूर्यफुलाचे तेल पूर्ण करते.


Show More

Related Articles

2 Comments

    1. सूर्यफुलाच्या बियांना तुम्ही भाजून खाऊ शकता. बाजारामध्ये भाजलेले बिया मिळतात.

Back to top button