Food
शरीरात उष्णता वाढवतात या भाज्या
काही भाज्या अशा असतात ज्या उन्हाळ्यात खाल्ल्यास अंगात उष्णता वाढते. उन्हाळ्यात खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष द्यावे लागते. भाज्या खाण्याचे सल्ले प्रत्येक जण देतात. मात्र प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळ्या भाज्या खाव्या लागतात. ज्यात कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन जास्त असते. खालील भाज्यांमध्ये उष्णता अधिक असते.
Table of Contents
कांदा आणि लसूण
कांद्यामध्ये शरीरात उष्णता निर्माण करणारे घटक असतात. तसेच यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो. कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता असते ज्यामुळे शरीराचे तापमान वाढते. कांद्याप्रमाणेच लसणातही मोठ्या प्रमाणात उष्णता असते. उन्हाळ्यात जास्त लसूण खाल्ल्याने हार्मोनल इम्बॅलन्सचा धोका असतो. यामुळे उन्हात लसणाचे अधिक सेवन करु नये.
पालेभाज्या
पालक, सागा सारख्या पालेभाज्या शरीरासाठी फायदेशीर असतात. यात अँटी ऑक्सिंडंटस असतात. मात्र या भाज्यांमध्ये प्रोटीन भरपूर असते. प्रोटीन जेव्हा ब्रेकडाऊन होतात तेव्हा उष्णता बाहेर पडते. यामुळे शरीराचे तापमान वाढते.
होऊ शकतात या समस्या
उन्हाळ्यात भाज्या खाणे बंद करु नका. कारण यात मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. मात्र ज्या भाज्यांमध्ये उष्णता अधिक असते त्या भाज्यांचे सेवन कमी करावे. यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स, पिंपल्स तसेच अन्य त्वचेच्या तक्रारी सतावू शकतात.
