Connect with us

आठवी नापास मुलाच्या इशाऱ्यावर चालते सीबीआई !

People

आठवी नापास मुलाच्या इशाऱ्यावर चालते सीबीआई !

आपल विश्वास जेवढा पोलिसांवर आहे त्याहूनही थोडा जास्त सीबीआई वर आहे. कोणताही गंभीर आणि मोठ्या गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे सोपवला जातो. पण ही सीबीआय आठवी नापास एका विद्यार्थ्याच्या इशाऱ्यावर चालते. कशी आणि का आपण पुढे पाहू.

शिक्षण हे यश मिळवण्यासाठी महत्वाचे आहे पण आवश्यकच आहे असे कोणी म्हणत असेल तर ते चुकीचे ठरेल. कारण जगात असे अनेक उदाहरणे आहेत जे हे सिद्ध करतात की शालेय शिक्षणा पेक्षा व्यावहारिक शिक्षण आणि अनुभव यामधून जो शिकतो तो जास्त यशस्वी होतो. याचेच एक उदाहरण आहे त्रिशनित अरोडा. पाहूया काय यश मिळवले आहे या आठवीत नापास झालेल्या विद्यार्थ्याने.

त्रिशनित हा एक एथिकल हैकर आहे. त्याने निवडलेल्या या मार्गाने त्याने करोडो रुपये कमवले आहेत. तुम्ही हैकर हा शब्द वाचून गोंधळला असाल कदाचित तुम्हाला वाटले असेल की आम्ही हैकर म्हणजे गैर मार्ग किंवा इंटरनेट वर चोरी किंवा अनधिकृत मार्गाने पैश्याची हेराफेरी करणाऱ्याचे गुणगान करत आहोत. पण तसे नाही त्रिशनित हा एथिकल हैकर आहे म्हणजेच इंटरनेट वरील पोलीस किंवा सिक्युरिटी गार्ड म्हणू शकता.

तुम्हा एथिकल हैकर म्हणजे काय हे थोडक्यात सांगायचे झाले तर हे लोक नेटवर्क किंवा सिस्टम इंफ्रास्ट्रक्चर वर देखरेख ठेवतात ते अधिकृत हैकर असतात आणि ते सिस्टम किंवा नेटवर्क मधील फाईल किंवा डाटा कोणी चोरी तर करत नाही ना याकडे लक्ष देतात. तसेच नेटवर्क आणि सिस्टीम मधील कच्चे दुवे जेथून हैकर नेटवर्क हैक करू शकतात हे शोधून काढतात आणि त्या कमकूवत दुव्यात सुधारणा करण्यासाठी सल्ले देतात इत्यादी कामे एथिकल हैकरची असतात.

त्रिशनितला लहानपणा पासून कॉम्पुटरची प्रचंड आवड होती त्यामुळे तो नेहमी त्यामध्येच व्यस्त असायचा आणि याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर झाला आणि तो आठवी मध्ये नापास झाला.

त्रिशनित अरोडा ने आपल्या वयाच्या 21 व्या वर्षी टीएसी सिक्युरिटी नामक कंपनी सुरु केली जी आता सीबीआई, गुजरात पोलीस, पंजाब पोलीस, रिलायन्स, एवन सायकल आणि अमूल सारख्या मोठ्या कंपन्यांना आणि सरकारी विभागांना आपली सर्विस देत आहे.

त्रिशनितला अनेक सरकारी अवार्ड मिळाले आहेत. त्रिशनितची कंपनीचा टर्नओवर वाढवून त्याला 2 हजार करोड पर्यंत घेऊन जाण्याचा त्याचा विचार आहे. सध्या त्रिशनित जगभरातील 500 कंपन्यांच्या सिक्युरिटीकडे लक्ष देत आहे.

अश्या प्रकारे आठवी नापास मुलगा सीबीआय आपल्या इशाऱ्यावर चालवत आहे. खरे तर सीबीआयच काय तो तर 500 पेक्षा जास्त कंपन्या आणि सरकारी विभाग आपल्या इशाऱ्यावर चालवत आहे.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top