Connect with us

सिलेंडरच्या किंमती मध्ये मोठी घट

Money

सिलेंडरच्या किंमती मध्ये मोठी घट

नॉन सब्सिडीप्रमाणेच सब्सिडीवाल्या सिलेंडरच्या किंमतीवरही सूट देण्यात आली आहे. कमर्शिअल वापरासाठी 19 किलोच्या सिलेंडरच्या किंमतीमध्ये सूट देण्यात आली आहे.

1 मार्चपासून सिलेंडरच्या किंमतीमध्ये सूट देण्यात आली आहे. इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

47 रूपये झाले कमी 

इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार,  सबसिडी देण्यात आलेल्या 14.2  किलोच्या  घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 45.50 रूपये ते 47 रूपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे.

मुंबईत गॅस सिलेंडरच्या किंमती 47 रूपयांनी कमी झाल्याने नव्या किंमतीनुसार गॅस सिलेंडर 661 रूपयांना मिळणार आहे.

सबसिडी देण्यात येणारा सिलेंडरदेखील स्वस्त  

1 मार्चपासून सबसिडी देण्यात येणारे सिलेंडरही स्वस्त मिळणार आहेत. मुंबईत 2.55 रूपये कमी झाल्याने आता तो सिलेंडर 490.80 रूपयांना मिळणार आहे.

वाचा : उन्हाळ्यात घराच्या आतील तापमान थंड ठेवण्यासाठी करा हे नैसर्गिक उपाय

कमर्शिअल वापरासाठी मिळणारा सिलेंडरही स्वस्त  

19 किलो वजनाचा कमर्शिअल सिलेंडरवरही 77 -80 रूपयांची सूट देण्यात आली आहे. मुंबईत 79 रूपयांची सूट देण्यात आल्याने आता हा सिलेंडर 1181   रूपयांना उपलब्ध होणार आहे.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : उन्हाळ्यात घराच्या आतील तापमान थंड ठेवण्यासाठी करा हे नैसर्गिक उपाय

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top