Connect with us

या बिया देतील टक्कल असलेल्यांना कंगवा करण्याची संधी आणि दीर्घकाळ काळे, घनदाट केस देऊ शकतात

Hair Care

या बिया देतील टक्कल असलेल्यांना कंगवा करण्याची संधी आणि दीर्घकाळ काळे, घनदाट केस देऊ शकतात

केसांमुळे व्यक्तिमत्व सुंदर आणि आकर्षक दिसते हे आपण सर्व मान्य कराल. आपल्याला सुंदर काळे आणि दाट केस पाहीजे असतात. त्यासाठी आपण आपल्या पद्धतीने काळजी घेण्याचा प्रयत्न देखील करतो पण काही कारणामुळे केस कधी गळता आणि टक्कल पडायला लागते. केस गळण्याच्या मागे अनेक कारणे असू शकतात पण आज आपण या कारणाच्या बद्दल नाही तर केस पुन्हा कसे काळे, दाट आणि लांब करता येतील हे पाहणार आहोत.

तुम्ही जडीबुटीच्या दुकानात मिळणारे गुंजाच्या बिया पाहिल्या असतीलच जर नसतील पाहिले तर खालील फोटो मध्ये पाहून घ्या.

केसांच्या वाढीसाठी आणि घनदाट करण्यासाठी आपल्याला 250 ग्राम गुंजाच्या बिया लागतील.

गुंजाला चिरमिटी, रत्ती, घुंघुचि या नावाने पण ओळखले जाते.

हे सफेद आणि लाल किंवा काळे आणि लाल या रंगात मिळतात.

जडीबुटी किंवा आयुर्वेदीक वनस्पती विकणाऱ्या दुकानात तुम्हाला या बिया सहज मिळतील.

सफेद रंगाच्या मिळाल्या तर त्या घ्या अन्यथा काळ्या रंगाच्याही चालतील.

गुंजाचे तेल कसे बनवायचे याची कृती

गुंजाच्या बिजा बारीक करून पावडर बनवून चाळून घ्या. चाळल्या नंतर उरलेले जाड पावडर फेकू नका.

बारीक पावडर पैकी 50 ग्राम पावडर वेगळी काढून ठेवा.

उरलेली 200 ग्राम पावडर जवळजवळ 1.5 लिटर पाण्यात मंद आचेवर एवढी उकळवा की पाणी जवळजवळ 500ml शिल्लक राहील.

आता या पाण्याला गाळून घ्या.

यानंतर एका लोखंडी भांड्यात 200 ग्राम तिळाचे थंड तेल घ्या. आता या तेला मध्ये 500ml गुंजाचा काढा जो आपण वर बनवलेला आहे तो आणि 50 ग्राम गुंजा पावडर जी आपण वेगळी काढून ठेवली होती ती हे सर्व या थंड तेला मध्ये मिक्स करा. लक्षात घ्या आपण आता पर्यंत तेल गरम केलेले नाही आहे ही सर्व सामग्री आपल्याला थंड तेला मध्येच मिक्स करायची आहे. आता हे मिश्रण मंद आचेवर गरम करण्यास ठेवा.

या मिश्रणातील सर्व पाणी जळून फक्त तेल उरेल एवढे हे मिश्रण उकळवा. हे टेस्ट करण्यासाठी की मिश्रणातील पाण्याचा अंश निघून गेला आहे तुम्ही एक लोखंडी तार किंवा लाकडी काडी घ्या आणि तिला कापूस गुंडाळून या मिश्रणात बुडवा आणि नंतर आगीवर धरा जर कापूस जळताना चटर पटर आवाज आला तर समजा की पाणी अजून बाकी आहे अन्यथा तुमचे तेल तयार झाले आहे.

जर तेल लावलेला कापूस आवाज न करता त्वरित जळाला तर समजा की तुमचे तेल शिजून तयार झाले आहे. आता हे तेल एखाद्या स्टीलच्या भांड्यात थंड होण्यासाठी ठेवा. तेल थंड होण्या सोबतच याचा काळेपणा पण भांड्याच्या खाली बसेल. एकदा का तेल थंड झाले की हे तेल एखाद्या कोरड्या काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बाटलीत भरून ठेवा.

हे चमत्कारीक तेल लावण्याची पद्धत

हे तेल केसांना दिवसातून 2 वेळा लावायचे आहे सकाळी-रात्री. तेल लावताना 5 मिनिट मालिश करा.

तेल वापरत असताना कोणत्याही साबणाचा किंवा शैम्पूचा वापर केस धुण्यासाठी करू नका. डोके धुनासाठी आंबट दही किंवा आंबट लस्सी किंवा लिंबू वापरा.

या तेलाच्या 1 महिन्याच्या वापरा नंतर तुम्हाला याचे परिणाम दिसण्यास सुरवात होतील. तुम्हाला इच्छे अनुसार परिणाम दिसायला लागतील. फक्त संयम आणि तेल दररोज सकाळी-रात्री सांगितल्या प्रमाणे लावा.

सोबतच अन्नतमूलच्या मुळाचे 2 ग्राम चूर्ण रोज खावे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : 5 मिनिटात पांढरेशुभ्र दात करण्यासाठी करा हे घरगुती उपाय

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top