foodhealth

शरीराचा अशक्तपणा फक्त 7 दिवसात संपवतो आणि मजबूत बनवतो हा उपाय

आपल्या देशात जवळपास प्रत्येक व्यक्ती जेवताना डाळ खातो आणि सर्वांना हे माहीत आहे की डाळ एक पौष्टिक आणि ताकत देणारे धान्य आहे. पण अश्याही काही डाळी आहेत ज्यांचे सेवन केल्यामुळे व्यक्ती निरोगी आणि ताकतवान राहण्या सोबतच शरीर देखील रोगमुक्त ठेवतात. आज आम्ही तुम्हाला एका अश्या डाळी बद्दल सांगत आहोत ज्याच्या जवळपास एक आठवड्याच्या सेवनामुळे तुम्हाला शरीरात अनेक लाभदायक फरक झाल्याचे जाणवेल आणि तुम्हाला शक्तिशाली झाल्याचा अनुभव येईल.

मुंग डाळीचे सेवन तुम्ही कोणत्याना कोणत्या स्वरूपात नक्की केला असेल. मुंग डाळ जसे मुंग डाळीचे वरण, मुंग सैंडविच, मुंग भजी, मोड आलेल्या मुंगचे सलाड, खिचडी अश्या अनेक रेसेपी मुंग डाळीच्या होतात. मुगाच्या डाळीचा उपयोग फक्त रेसेपी बनवण्यासाठी नाही तर वजन कमी करण्यासाठी पण लोक करतात. कारण मोड आलेल्या मुगाच्या सेवनामुळे शरीराला फक्त 30 कैलोरी आणि 1 ग्राम फैट पोचते. अंकुरित मुंग डाळीत अनेक पोषक तत्व जसे मैग्‍नीशियम, कॉपर, फ़ोलेट, राइबोफ्लेविन, विटामिन, विटामिन सी, विटामिन बी, फ़ाइबर, पौटेशिय, कैल्शियम, फ़ास्फ़ोरस, मैग्नीशियम, आयरन, विटामिन बी -6, नियासिन, थायमिन आणि प्रोटीन असते यासाठी याच्या सेवनामुळे आरोग्याच्या दृष्टीने लाभ मिळतात.

फायदेशीर अंकुरित मुंग डाळ

शरीराची कमजोरी : ज्या लोकांना थोडेसे काम केल्याने शरीरात कमजोरी आणि थकवा जाणवतो त्या लोकांनी मुंग डाळ सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी खावी. याच व्यतिरिक्त व्यायाम केल्या नंतर मुगाची डाळ सेवन केली जाऊ शकते आणि शरीराची प्रोटीनची कमी अंकुरित मुंग डाळ खाऊन भरून काढता येते आणि शरीर ताकतवान बनवता येते.

पोषक तत्वांनी परिपूर्ण : संतुलित आहार आणि योग्य पोषक तत्व मिळवण्यासाठी मोड आलेले मुग आवश्य सेवन करावे कारण ते शरीराच्या आवश्यक तत्वांची पूर्तता करतात. मुग अंकुरित केल्यास विटामिन सी, आयरन तसेच फॉस्फोरसचे प्रमाण अनेक पटीने वाढते.

रोग प्रतिरोधक क्षमता वाढ : रोग प्रतिरोधक क्षमता वाढवण्यासाठी आणि शरीराला आजारा पासून वाचवण्यासाठी रोज मुग डाळ खावे. यामध्ये असलेले एंटी-माइक्रोबियल आणि एंटी-इंफ़्लामेट्री गुण शरीराची इम्युनिटी पॉवर वाढवतो.

बद्धकोष्ठ मध्ये आराम : अंकुरित मुगामध्ये फायबर भरपूर असते. जे पचन क्रिया व्यवस्थित ठेवून बद्धकोष्ठ मध्ये आराम देते.

ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवतो : यामध्ये असलेले पेप्टिसाइड बीपी संतुलित ठेवते आणि शरीराला फिट ठेवते ज्यामुळे तुम्ही हेल्दी आणि एक्टीव राहता.

आयरनचा चांगला स्रोत : मुगामध्ये आयरन भरपूर असते. एनिमिया रोगापासून वाचण्यासाठी आयरनची कमी दूर करण्यासाठी मुग डाळीचे भरपूर सेवन करा.

वजन कमी करण्यासाठी मदत : जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही मोड आलेले मुग सेवन करा यामुळे लवकर भूक लागत नाही आणि हे कैलोरी कमी करण्यास मदत करतात. यासाठी रात्रीच्या जेवणात चपाती सोबत एक वाटी मोड आलेले मुग खावे ज्यामुळे तुम्हाला भरपूर पोषण पण मिळेल.

शरीर धष्ट्पृष्ट बनवते : शरीरातील कमजोरी दूर करून शरीर धष्ट्पृष्ट बनवते. कोणत्याही आजारा नंतर येणारी कमजोरी अशक्तपणा मुग दूर करते.

केस गळण्याची समस्या : अंकुरित डाळ तुमच्या त्वचे सोबतच केसांच्या सुंदरते मध्ये वाढ करण्यासाठी मदत करते. जर तुमचे केस गळत असतील तर तुम्ही मोड आलेले मुग एक वाटी रोज सकाळी नाश्त्या मध्ये घ्यावे. असे केल्यामुळे केसांना योग्य पोषण मिळेल.

खाज-खुजली, खरुज : जर खाज-खुजलीचा त्रास होत असेल तर मुग साली सकट पेस्ट करून ही पेस्ट प्रभावित जागी लावावी आराम मिळेल.

तर आज पासूनच मोड आलेल्या मुगाचे सेवन सुरु करा आणि रक्त अल्पता, हाडांचे आजार, मानसिक तणाव, बद्धकोष्ठ, अनिद्रा, मुळव्याध, वजन वाढणे तसेच पोटाच्या इतर समस्या मध्ये आराम मिळतो.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमच्या पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : दररोज हे पिण्यामुळे 36 ची कंबर रातो-रात 25 ची होईल, मुलींनी जरूर वाचावे


Show More

Related Articles

Back to top button