Connect with us

Tips to Straighten Hair: केसांना सरळ करण्यासाठी टिप्स

Hair Care

Tips to Straighten Hair: केसांना सरळ करण्यासाठी टिप्स

केसांच्या बाबतीत वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी आवड निवड असते. काही लोकांना कुरळे केस आवडतात तर काही लोकांना सरळ केस आवडतात. सरळ आणि रेशमी केसांमुळे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक सुंदर हेयर स्टाईल करू शकता. जर तुम्हाला सरळ केस आवडतात आणि तुमचे केस सरळ नाही आहेत तर खालील काही टिप्स वापरून तुम्ही सरळ आणि रेशमी केस मिळवू शकता. चला पाहू सरळ केस करण्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या काही टिप्स.

Tips to Straighten Hair: केसांना सरळ करण्यासाठी टिप्स

ओल्या केसांना ब्रश करा : केस धुतल्यानंतर ओले असताना केसांना ब्रश करा आणि केसांना कोरडे होई पर्यंत ब्रश करत राहा. यामुळे तुमचे केस कोरडे झाल्यानंतर देखील सरळ आणि व्यवस्थित राहतील.

केसांना बांधून ठेवा : केसाना सैल रबर वापरून वरून खाली बांधावे आणि जागो जागी रबर लावावे. पण केसांना रबर एवढा सैल बांधने आवश्यक आहे ज्यामुळे केसावर त्याच्या खुणा राहणार नाही आणि केस सरळ राहतील.

 

सरळ केसासाठी मास्क बनवा : पोषण कमी असल्यामुळे देखील केस वेडेवाकडे होण्याची शक्यता असते. यामुळे केस सरळ मिळवायचे असतील तर हेयर मास्क बनवा. त्यासाठी एका भांड्यामध्ये नारळाचे दुध, मध आणि ऑलिव ऑईल मिक्स करून केसांना लावा आणि त्यानंतर एका तासाने धुवून घ्या.

एलोवेराचा वापर : केसांना चमकदार आणि हाइड्रेट बनवण्यासाठी एलोवेराचा वापर करावा. एलोवेरा जेल केसावर व्यवस्थित लावावे आणि केसांना सुकवावे. तुम्हाला वाटल्यास जेल लावून तुम्ही बाहेर जावू शकता किंवा शैम्पू लावून स्वच्छ करू शकता.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top