inspiration

पूर्ण सत्याचा तपास केल्या नंतरच कोणासही अपराधी मानले पाहिजे

एका राजाने आपल्या मुलाला शिक्षणासाठी गुरुकुल मध्ये पाठवले. तेथे राहून राजकुमार शिक्षण घेऊ लागला. गुरु शिक्षण देण्यात जेवढे उत्तम होते, तेवढेच कडक स्वभावाचे होते. जर एखाद्या शिष्या कडून जर काही चूक झाली तर त्यास दंड आवश्य देत होते.

एकदा गुरुकुलातील शिष्यानी काही चूक केली. जेव्हा दंड देण्याची वेळ आली तेव्हा गुरु ने राजकुमाराला देखील दोषी मानले आणि त्याला देखील दंड दिला, परंतु राजकुमाराची काहीही चूक नव्हती. राजकुमाराला हि गोष्ट चुकीची वाटली कि विना कारण त्याला दंड भोगावा लागला.

वेळ निघून गेला आणि राजकुमार शिक्षा प्राप्त करून आपल्या राज्यात निघून गेला. लवकरच तो राजा बनला. राजा बनल्यावर त्याने आपल्या गुरूला राजमहालात बोलावले आणि विचारले कि- काही वर्षा पूर्वी तुम्ही मला विना कारण दंड का केला होता?

खरंतर तुम्हाला माहीत होते कि मी कोणताही अपराध देखील केला नव्हता. गुरु ने हसून उत्तर दिले कि- त्यावेळी तुझी बुद्धिमत्ता आणि साहस पाहून मी समजलो होतो कि एक दिवस तू आपल्या वडिलांच्या साम्राज्याचा उत्तराधिकारी नक्की होणार.

तेव्हा मी हा निश्चय केला कि तुला या गोष्टीचे ज्ञान असले पाहिजे कि कोणत्याही व्यक्तीवर केलेला अन्याय त्याच्या हृदया मध्ये जीवनभर सलत राहते. मी आशा करतो कि तू कोणत्याही व्यक्तीला विना कारण कधीही छळणार नाहीस.

गुरुचे म्हणणे ऐकल्या नंतर नवीनच राजा झालेल्या राजकुमाराला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्याने आपल्या गुरुची माफी मागितली. सोबतच त्याने वचन दिले कि – कोणासही दंड देण्याच्या अगोदर मी पूर्ण तपास करेल. त्यानंतरच कोणताही निर्णय घेईल.

लाइफ मेनेजमेंट

विना सत्य तपासता कोणासही अपराधी मानले नाही पाहिजे. असे केल्याने त्याच्या मनावर वाईट प्रभाव पडतो. त्या व्यक्तीला वाटते कि त्याच्या सोबत विनाकारण अन्याय केला गेला आहे. यामुळे त्याच्या भविष्यावर देखील वाईट परिणाम होऊ शकतो.


Show More

Related Articles

Back to top button