Hair Care

पांढरे केस न होण्यासाठी हे घरगुती उपाय करा

हल्लीच्या वातावरणामुळे आणि लाइफस्टाइलमुळे लोकांचे केस अवेळी सफेद होऊ लागले आहेत. मंग हे सफेद केस लपवण्यासाठी आपण मेहंदी किंवा हेयर कलरचा आधार घेतो. पण आज आम्ही काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे केस सफेद होणे थांबतील किंवा निदान त्याच्या सफेद होण्याचा वेग मंद होईल. चला तर पाहू कोणते आहेत ते उपाय.

पांढरे केस न होण्यासाठी हे घरगुती उपाय

कांद्याचे सौंदर्याच्या दृष्टीने अनेक उपयोग आहेत. पांढरे केस रोखण्यासाठी त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. कांद्याची बारीक पेस्ट करुन त्यामध्ये लिंबाचा रस घाला. केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येवर याचा चांगला उपयोग होतो. ही घट्ट पेस्ट केसांच्या मूळांना आणि पांढऱ्या केसांना लावा. अर्ध्या तासाने केस धुवून टाका. यामुळे पांढरेपणा कमी होण्यास मदत होईल.

केसांच्या वाढीसाठी आणि केसांचा नैसर्गिक रंग टिकून रहावा यासाठी आवळ्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. आवळ्याचा रस आणि बदाम तेल एकत्र करुन त्याने केसांना मसाज केल्यास त्याचा केसांचा पोत सुधारण्यासाठी अतिशय चांगला उपयोग होतो.

ताक केसांच्या वाढीसाठी आणि इतर समस्यांसाठीही उपयुक्त असते. ताकाने केस धुतल्यास मूळे आणि पोत सुधारण्यास मदत होते. याशिवाय अकाली केस पांढरे होत असल्याची समस्या सतावत असेल तर एका वाटीत ताक घ्या. त्यामध्ये कडिपत्त्याच्या पानांचा रस घाला. हे मिश्रण थोडे घट्ट होण्यासाठी यामध्ये थोडे दही घाला. हे मिश्रण केसांना लावून चांगल्या पद्धतीने मसाज केल्यास केसांचा रंग बदलण्यास मदत होते. अर्धा तास हे मिश्रण लावून ठेऊन नंतर केस धुवून टाका.

कडिपत्ता केस काळे होण्यासाठीही उपयुक्त असतो. कडिपत्त्याची पेस्ट करुन त्यामध्ये खोबरेल तेल घालून हे मिश्रण केसांना लावावे. केसांच्या मूळांना हे मिश्रण लावल्यास पांढरे केस येणे मूळातूनच कमी होते.


Show More

Related Articles

Back to top button