health

पाठीचे दुखणे दूर ठेवण्यासाठी करा या 5 गोष्टी

ऑफिस मध्ये किंवा गाडी चालवताना, प्रवास करताना एका ठिकाणी भरपूर वेळ बसल्याने पाठदुखीचा त्रास होतो. कंबरेवर ताण आल्याने मणक्याला आधार देणारे स्नायू आणि रक्तवाहिन्यावर भार येतो. यासाठी जर पाठीचा त्रास होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर खाली दिलेल्या काही टिप्स वापरा.

नियमित व्यायाम करावा

आजकाल कॉम्प्यूटरमुळे अनेक लोकांना एका जागी बसून काम करावे लागते. तसेच दररोजचा प्रवास आणि इतर अनेक कारणामुळे पाठीवर ताण पडतो आणि पाठदुखी सुरु होते. शरीराची हालचाल कमी असल्यामुळे हाडं आणि स्नायू कमजोर होतात. बैठ्या काम करणाऱ्या लोकांनी मणक्याची काळजी घेतली पाहिजे. पाठीचा त्रास असणाऱ्या लोकांनी याकडे दुर्लक्ष करू नये. नियमित व्यायाम करणे फायद्याचे राहील.

नेहमी ताठ बसा

बसताना आपल्या शरीराची स्थिती कशी आहे यावर देखील बरेचसे अवलंबून असते. नेहमी ताठ बसावे, वाकून बसू नये.

वेळोवेळी ब्रेक घ्या

काम करताना अधूनमधून वेळोवेळी ब्रेक घेत जा. दोन तासा पेक्षा जास्त वेळ एकाच ठिकाणी बसू नये. आपल्या खुर्चीतून उठून अधूनमधून फेरफटका मारला पाहिजे.

गुडघ्यांची हालचाल

एकाच ठिकाणी बसल्यामुळे पायांनाही वेदना होतात. हे टाळण्यासाठी गुडघे आणि पायांची हालचाल करत राहा.

जास्त वजन उचलू नये

कोणतेही वजन उचलताना काळजी घ्या कि ते वजन जास्त असू नये. अधिक जास्त वजन उचलण्याच्या प्रयत्न करू नये. त्यामुळे पाठीवर ताण येऊ शकतो.


Show More

Related Articles

Back to top button