नवरात्रीच्या दिवसात करा हे विशेष उपाय, देवी होईल प्रसन्न पूर्ण करेल बिघडलेलं काम, मनोकामना होईल पूर्ण

लवकरच वातावरण भक्तिमय होणार आहे कारण नवरात्रीचे दिवस लवकरच सुरु होणार आहेत. 29 सप्टेंबर 2019 पासून नवरात्रीचे पर्व सुरु होणार आहे. नवरात्रीला आनंद आणि समृद्धीचा सण मानला जातो. असे मानले जाते कि नवरात्री व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येते. हे नऊ दिवस आपण देवीची पूजा आणि भक्ती करतो, घटस्थापना करतो. तसेच काही उपाय आहेत जे नवरात्रीच्या दिवसात केल्याने देवी आपल्याला शुभ आशीर्वाद देते.

जर आपल्याला वाटते कि देवी माता आपल्यावर प्रसन्न व्हावी तर आज आम्ही आपल्याला नवरात्रीच्या दिवसातील विशेष उपाय सांगत आहोत. या उपायाने माता प्रसन्न होऊ शकते आणि आपले बिघडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या उपायामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतील.

नवरात्रीच्या दिवसात करा हे विशेष उपाय

जर आपण जागा-जमिनीच्या संबंधित कोणतीही खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा घर बनवण्याचा विचार असेल तर आपण नवरात्रीच्या दिवसांमध्ये माती पासून बनलेले एक घर खरेदी करून घेऊन यावे आणि यास देवीच्या पूजा स्थानी ठेवावे आणि रोज 9 दिवस मातेची आराधन केल्या नंतर या मातीच्या घराला टिळा लावावा. जर आपण हा उपाय केला तर यामुळे माता लवकरच आपली मनोकामना पूर्ण करेल.

जर आपण कोणतेही नवीन काम सुरु केले आहे किंवा करू इच्छिता, किंवा आपली तशी इच्छा आहे तर आपण नवरात्री मध्ये 9 दिवस दुर्गा मातेला कुंकू अर्पित करावे.

जर आपल्या नोकरी किंवा व्यापारा मध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल किंवा प्रगती पाहिजे असेल तर नवरात्री मध्ये आपण घरा मध्ये तीन पाणीवाले नारळ (शहाळ) घेऊन या. या नारळांना नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी मातेच्या कोणत्याही मंदिरा मध्ये अर्पण करा, यामुळे नोकरी आणि व्यापारातील अडथळे दूर होतील आणि आपल्याला प्रगती प्राप्त होईल.

जर आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या सुरु असतील तर यापासून सुटका मिळवण्यासाठी नवरात्रीच्या दिवसात कमळाच्या फुलावर विराजमान असलेल्या माता लक्ष्मीचे पूजन करावे. या उपायाने आपल्या घरा मध्ये कधीही धनाची होणार नाही आणि आपल्या धना मध्ये सतत वाढ होईल.

वैवाहिक जीवना मध्ये जर काही समस्या उत्पन्न होत असेल तर अश्या स्थिती मध्ये आपण नवरात्री मध्ये शृंगाराच्या वस्तू दान कराव्यात आणि मातेला लाल फुलांची माळ अर्पित करावी. यामुळे आपले वैवाहिक जीवना मध्ये असलेल्या समस्या लवकरच दूर होतील.