Breaking News

सोनू सूद यांची सुंदर पत्नी सोनाली, लग्नाच्या अनेक वर्षा नंतर देखील लाइमलाइट पासून राहते लांब

‘दबंग’ या चित्रपटा मध्ये सलमान खान (Salman Khan) च्या समोर देखील आपल्या अभिनयाची आणि अस्तित्वाची छाप सोडलेला अभिनेता म्हणजेच सोनू सूद (Sonu Sood), बॉलिवूडमधील बहुतेक फिल्म मध्ये याने खलनायकाची भूमिका साकारली आहे. पण खऱ्या जीवनात तो एखाद्या देवदूतापेक्षा कमी नाही. मागील अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी जे जे काही शक्य होईल ते करत आहे. बस आणि खाणेपिणे या गोष्टीची त्याने सोय करून दिली आहे. म्हणूनच त्यांची सगळीकडे चर्चा होत आहे.

सोनू सूद एक अभिनेता म्हणून खूप लोकप्रिय आहे पण त्याची फॅमिली लाइमलाइटपासून दूरच आहे. चला तर मग जाणून घेऊया सोनू सूदच्या कुटूंबाबद्दल. पंजाबच्या मोगा येथे जन्मलेल्या सोनू ने हिंदी, तेलगू कन्नड आणि तमिळ चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. टॉलिवूड ते बॉलिवूड प्रसिद्ध असलेल्या सोनू सूद यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनियरिंग केली आहे.

सोनू सूद यांच्या पत्नीचे नाव सोनाली (Sonali Sood) आहे. सोनू आणि सोनालीचे 1996 साली लग्न झाले. त्याला दोन मुलगेही आहेत. सोनालीचा बॉलीवूडशी कोणताही संबंध नाही. कदाचित म्हणूनच ती प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करते. सोनू हा एक फैमिली मैन आहे. ते बऱ्याचदा आपल्या मुलांसह हॉलिडे वर जातात.

सोनू आणि सोनाली यांची भेट तेव्हा झाली जेव्हा ते इंजिनियरिंग शिकत होते. सोनू पंजाबी आहे, तर सोनाली दक्षिण भारतीय आहे. सोनालीबद्दल बोलताना सोनूने सांगितले की सोनाली त्याच्या आयुष्यात येणारी पहिली मुलगी आहे. सुरुवातीला सोनूला चित्रपटसृष्टीत खूप संघर्ष करावा लागला.

या कठीण क्षणी, सोनालीने प्रत्येक वेळी सोनूची साथ दिली. लग्नानंतर दोघेही मुंबईत शिफ्ट झाले. एका मुलाखतीत सोनूने आपल्या पत्नीचे कौतुक करताना सांगितले की, ‘सोनाली नेहमीच सपोर्टिव राहिली आहे. पूर्वी मी अभिनेता व्हावे अशी तिला इच्छा नव्हती पण आता तिला माझा अभिमान आहे.’

सोनूने 1999 साली आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात ‘कल्लाजहगर’ या तमिळ चित्रपटातून केली होती. त्याला खरी ओळख ‘युवा’ या चित्रपटा मधून मिळाली. यानंतर ‘एक विवाह … ऐसा भी’, ‘जोधा अकबर’, ‘शूटआऊट अट वडाळा’, ‘दबंग’, ‘सिंबा’ या चित्रपटांनी त्यांना प्रसिद्धी दिली. सध्या सोनू सूद हे प्रवासी कामगारांसाठी एक देवदूत मानला जात आहे. त्याच्या कार्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.