celebrities

धक्कादायक..!बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर

बॉलीवूड मधील कलाकार संकटा मध्ये सापडण्याचे सत्र सुरूच आहे. अभिनेता इरफान खान पाठोपाठ आता अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर असल्याची माहिती समोर आली आहे. एका रिएलिटी शो मध्ये जजच्या भूमिकेत असणारी सोनाली बेंद्रे या शो मधून अचानक बाहेर गेली आहे. त्याबद्दल एक खुलासा झालेला आहे.

सोनाली बेंद्रेने दिली माहिती

सोनालीने आपल्या सोशल मिडिया अकाऊन्ट वरून कॅन्सर बद्दलची माहिती दिलेली आहे. तिच्या पोस्ट अनुसार तिला हाय ग्रेड कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे. काही टेस्ट केल्या नंतर हे स्पष्ट झाले आहे. सध्या तिच्यावर अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे उपचार सुरु आहेत.

कॅन्सर सोबत लढाई :

सोनाली बेंद्रे कॅन्सरसोबत सक्षमपणे लढा देत आहे. या आजारावर मात करण्यासाठी डॉक्टरांसोबतच, सोनाली बेंद्रे सज्ज आहे. या कठीण काळात माझ्या परिवाराचा, मित्रांचा पाठिंबा आहे.


Show More

Related Articles

Back to top button