आज शिव शंकर करणार 9 राशींवर आपली कृपा, होणार मनोकामना पूर्ण

मेष राशी भविष्य (Monday, July 22, 2019)
आपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला अपरिमित आनंद होईल. मोठया योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल – त्या व्यक्तिची विश्वासनीयता तपासून पाहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. जीवनसाथीचे आरोग्यामुळे तुम्हाला काळजी वाटेल. वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्हाला विसरावे लागेल. संयुक्त प्रकल्प आणि भागीदारी संदर्भातील नवीन करार करण्यापासून लांब राहा. आजच्या दिवशी केलेले स्वयंसेवी कामाचा उपयोग केवळ ज्यांना मदत केली त्यांनाच न होता स्वत:कडे सकारात्मकपणे पाहण्यास होईल. एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईझ देईल, पण त्यामुळे तुमची योजना बारगळेल.

वृषभ राशी भविष्य (Monday, July 22, 2019)
नको ते विचार मनात घोळतील. शारीरिक व्यायाम करा कारण रिकामे डोके हे सैतानाचे घर असते. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. पालकांचे आरोग्य सुधारेल आणि ते तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील. तुम्हाला प्रेमातील वेदनेचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामामुळे प्रचंड व्यस्त व्हाल – त्यामुळे आराम करायला आज फुरसत मिळणार नाही. अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला महत्त्वाची आमंत्रणे मिळतील. कोणा तिसऱ्याने कान फुंकल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल, पण तुमच्या प्रेमामुळे सर्व काही ठीक होईल.

मिथुन राशी भविष्य (Monday, July 22, 2019)
अनावश्यक तणाव आणि चिंता यामुळे तुमचा दिवसभराचा आनंद मावळेल. यावर मात करा अन्यथा समस्या अधिक गंभीर बनेल. दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. कुटुंब-मुले आणि मित्रमंडळी यांच्यासमवेत वेळ घालवल्याने तुमच्या मनाला पुन्हा एकदा उभारी मिळेल. आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. तुमच्या फायद्यासाठी तुमच्या बुद्धिमत्तेची ताकद वापरा. नवीन संकल्पना देण्याबरोरच व्यावसायिक प्रकल्प पूर्ण करण्यात तुम्हाला त्याचा उपयोग होईल. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. सातत्याने भांडणे झाल्याने तुम्हाला नातेसंबंध तोडून टाकावेत असे वाटेल. परंतु, इतक्या सहज नातेसंबंध तोडू नका.

कर्क राशी भविष्य (Monday, July 22, 2019)
प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. तुमच्या खाजगी आयुष्यात मित्र प्रमाणाबाहेर हस्तक्षेप करतील. तुमच्या प्रियजनांसोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा, मजा लुटा. वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो, पण तुम्ही डोकं शांत ठेवणे गरजेचे आहे. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमचे वैवाहिक आयुष्य सुखी करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत होतात, त्याचे आज अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम दिसून येतील.

सिंह राशी भविष्य (Monday, July 22, 2019)
तुमचा आनंदी उत्साही स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल. लोकांना नेमके काय हवेय हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या – परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस आहे. प्रेम अमर्याद असते, असीम असते; हे तुम्ही या पूर्वी ऐकले असेल, पण आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात. हाती घेतलेल्या नव्या कामातून अपेक्षापूर्ती होण्याची कमी शक्यता आहे. आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपला कोणताही ठावठिकाणा ठेवणार नाहीत. विवाहानंतर पापाचं रुपांतर पुजेत होतं आणि आज तुम्ही भरपूर पुजा करणार आहात.

कन्या राशी भविष्य (Monday, July 22, 2019)
मित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. व्यवस्थित संवाद साधून आणि सहकार्याने जोडीदाराशी संबंध सुधारतील. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. तुम्हाला आज प्रेमाच्या चॉकलेटची चव चाखायला मिळणार आहे. आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील आणि तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचलेले असाल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल.

तुल राशी भविष्य (Monday, July 22, 2019)
मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दु:खी प्रसंगात सामील व्हा, तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकेल. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह तुम्हाला तीव्र दु:ख देईल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस खूप सुंदर असेल. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुमचा/तुमची त्याच्या/तिच्या कामात इतका व्यस्त होईल, की तुम्ही त्यामुळे अस्वस्थ व्हाल.

वृश्चिक राशी भविष्य (Monday, July 22, 2019)
तुमच्या निराशावादी दृष्टिकोनामुळे तुम्ही कोणतीही प्रगती करू शकणार नाही. चिंता करण्याच्या प्रवृत्तीमुळे तुमची विचारशक्ती मंदावली आहे हे ओळखण्याची हीच खरी वेळ आहे. उजळ बाजूकडे पाहा आणि त्यामुळे तुमच्या निर्णयात बदल कराल. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. संध्याकाळी तुमच्या मुलांबरोबर काही आनंदाचा काळ घालवा. तुमचे दैवी आणि अप्रश्नांकित प्रेम यात जादुई कलात्मक शक्ती आहे. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. आज प्रवास करणार असाल तर तुमच्या सामानाची विशेष काळजी घ्यावी. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवते व्यतित केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल

धनु राशी भविष्य (Monday, July 22, 2019)
दीर्घ आजाराशी लढा देताना स्वत:वरचा विश्वास हाच तुम्हाला हिरो ठरवू शकतो, हे ओळखा. तुमच्या पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील – तुमचा खर्च खूप अधिक होईल किंवा तुमचे पाकीट हरवेल – निष्काळजीपणामुळे काही तोटा निश्चितपणे होईल. शांतता राहावी आणि कौटुंबिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी तुम्ही रागावर मात करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रेम आणि रोमान्स तुमचा मूड आनंदी राखतील. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. काहींच्या मते लग्न म्हणजे भांडणं आणि सेक्स, आजा मात्र सगळं शांत आणि प्रसन्न असेल.

मकर राशी भविष्य (Monday, July 22, 2019)
आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. ‘सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी बोलू नका – तुम्ही प्रेम करीत असलेल्या व्यक्ती दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या. प्रेम हे वसंत ऋतूसारखे असते, फुले, हवा, सूर्यप्रकाश, फुलपाखरे. तुम्हाला रोमँटिक गुदगुल्या होतील. तुमचा/तुमची जोडीदार आज दिवसभर तुमचा विचार करेल. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. खूप काळानंतर आज तुम्ही खरंच जवळीक साधाल आणि तुमच्या जोडीदाराला मिठीत घ्याल.

कुम्भ राशी भविष्य (Monday, July 22, 2019)
तुमच्या मनावर ग्रासलेला विषाद काढून टाका – त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडसर निर्माण झाला आहे. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. प्रभावी ठरणाºया आणि महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल. आजच्या दिवशी प्रेमामध्ये यातना सहन कराव्या लागण्याची शक्यता आहे. प्रवसामुळे नवीन व्यवसाय संधी मिळतील. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. अनपेक्षित पाहुण्यामुळे तुमचे प्लॅन कदाचित बारगळथील, पण तुमचा दिवस निश्चितच चांगला जाईल.

मीन राशी भविष्य (Monday, July 22, 2019)
कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. मुलांच्याबाबतीत सहनशीलता बाळगा किंवा तुमच्या पेक्षा कमी अनुभवी व्यक्तींबाबत धीर धरा. अचानक प्रणयाराधन करायला मिळाल्याने तुम्ही गोंधळून जाल. अन्य देशांतील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. आजच्या दिवशी तुमचा/तुमची जोडीदार क्षणार्धात तुमची दु:ख दूर करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here