Featured

तुमच्या डोळ्यांचे काजळ आता पसरणार नाही, पहा का आणि कसे

मुलींच्या मेकअप मधील सर्वात महत्वाचा भाग आहे डोळ्यांचा मेकअप तो जर व्यवस्थित असेल तर तीचे रूप सुंदर दिसतेच.

काजळाने मुलींचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. यामुळे काजळ प्रत्येक मुलीच्या मेकअपच्या सामानातील महत्वाची गोष्ट असते. अनेक मुलींचा चेहरा काजळाने इतका खुलतो की एखाद्या दिवशी काजळ न लावल्यास चेहरा कोमेजलेला दिसतो.

काजळ लावणे हीदेखील एक कला आहे. काजळाचे स्ट्रोक कशाप्रकारे लावले जातात हे महत्वाचे असते. काजळ चांगल्या प्रकारे लावणेच पुरेसे नसते. तर ते पसरू नये यासाठी काळजी घेणेही आवश्यक असते. यासाठी तुम्ही खालील उपायांचा अवलंब करू शकता.

Eye with black fashion make-up

काजळ लावण्यापूर्वी टोनरने आपला चेहरा स्वच्छ करा. यामुळे त्वचेवरील तेल निघून जाईल व काजळ पसरणार नाही.

काजळ लावण्यापूर्वी डोळ्याखाली थोडे पावडर लावा. गरज वाटल्यास ब्रश किंवा स्पंजच्या मदतीने तुम्ही डोळ्याखाली पावडर लावू शकता.

नेहमी वॉटरप्रूफ काजळ वापरा. वॉटरप्रूफ काजळ पसरत नाही व दीर्घकाळ टकून राहते.

आयलायनर लावून मग काजळ लावल्यास ते पसरत नाही.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : पोट साफ होत नाही, मुरुमे येतात, झोप येत नाही तर करा हा 1 मिनिटाचा उपाय


Show More

Related Articles

Back to top button