Connect with us

पेटीएमचे पार्टनर बनून करा कमाई, ही आहे प्रॉसेस

Money

पेटीएमचे पार्टनर बनून करा कमाई, ही आहे प्रॉसेस

पेटीएमचे बिझनेस पार्टनर होऊन तुम्ही चांगली कमाई करु शकता. हा व्यवसाय खूपच सोपा आहे. आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत, की पेटीएम तुम्हाला कसे बिझनेस पार्टनर बनवतो. तुम्ही तुमच्या नव्या किंवा जुन्या व्यवसायाला पेटीएमच्या आधारे पुढे नेऊ शकता.

पेटीएमचे एजंट बना

– पेटीएमने आपली पेमेंट बॅंक सुरु केली आहे. पेटीएम पेमेंट बँकद्वारे ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी देशभरात एजेंट नियुक्त करण्यात येत आहेत. त्यांना पेटीएम पेमेंट बँक बीसी एजंट असे म्हटले जाणार आहे. हे एजंट पेटीएम प्रोडक्ट विकतील आणि त्या बदल्यात त्यांना पेटीएमद्वारे आकर्षक कमिशन देण्यात येईल.

कसे बनू शकता एजंट

जर तुम्हाला एजंट बनायचे असेल तर किती गुंतवणूक करावी लागेल हे पहिल्यांदा जाणून घ्या. तुमच्याकडे अॅन्ड्रॉइड स्मार्ट फोन, बायोमेट्रिक डिव्हाइस याशिवाय किती कॅश आहे, याआधारे तुम्ही पेटीएमसाठी काम करु शकता. यासंदर्भात माहितीसाठी https://paytm.com/offer/bc-faqs/ या लिंकवर तुम्ही जाऊ शकता.

सेलर होऊन व्यवसाय करा

तुम्ही पेटीएमचे सेलरही होऊ शकता. पेटीएमद्वारे पेटीएम मॉल नावाने ऑनलाईन शॉपिंगही करता येते. तुम्ही पेटीएमचे सेलर होऊन चांगली कमाई करु शकता. पेटीएमची पोहच जवळपास 8 कोटी लोकांपर्यंत आहे. तुम्ही पेटीएमचे सेलर बनल्यास तुमच्या बिझनेस चालण्याची बरीच शक्यता आहे.

मोफत सुरु करा व्यवसाय

तुम्ही पेटीएमचे विक्रेते होऊ इच्छित असाल तर पेटीएम तुमच्याकडून कुठलाही चार्ज घेणार नाही. त्यासाठी तुम्हाला फक्त पेटीएम अॅप किंवा वेबसाईटवर साईन करावे लागेल. आपले प्रोडक्ट किंवा सर्विस कॅटलाँगला अपलोड करावे लागेल आणि सेलिंग सुरु करायचे आहे.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top