foodhealth

संशोधनात समजले स्लो प्वाइजन आहेत हे 10 खाद्य पदार्थ… यासाठी कमी खावे किंवा खाऊच नयेत

आजकाल लोक फक्त फास्टफूड म्हणजे प्वाइजन मानतात. पण हे अत्यंत कमी लोकांना माहित आहे कि आपण दैनंदिन जीवनात अश्या अनेक वस्तू खातो जे आपल्याला आरोग्यवर्धक वाटतात पण खरतर त्या वस्तू धोकादायक आहेत. यामधीलच एक वस्तू आहे साखर. भलेही लोक तोंड गोड करण्यासाठी साखर मोठ्या आवडीने खातात. पण कमी लोकांना माहित आहे कि साखर आपल्या शरीरासाठी खतरनाक आहे.

संशोधनात केला दावा

खरतर ब्रिटनचे प्रोफेसर जॉन युडकीन यांनी आपल्या रिसर्चमधून हि गोष्ट सिद्ध केली आहे कि साखर हे “पांढरे विष” आहे, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. शोधा अनुसार यास खाण्यामुळे कोलेस्टेरॉल वाढते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंती जाड होतात आणि हार्ट अटैक येण्याची शक्यता वाढते.

परंतु शोधा मध्ये फक्त साखरच स्लो प्वाइजन असल्याचे अधोरेखित केलेले नाही तर अश्या अजून खाद्य पदार्थ आहेत ज्यांचा परिणाम आपल्या शरीरावर विषाच्या समान होतो. भलेही त्याचा परिणाम होण्याची गती कमी आहे. तर चला पाहू असे कोणते खाद्य पदार्थ आहेत जे आपल्या शरीरासाठी विषा पेक्षा कमी नाही.

कोम आलेले बटाटे

अनेक लोक कोम आलेले बटाटे खाणे देखील खातात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल कि यामध्ये ग्लाइकोअल्केलाइड्स असते, ज्यामुळे डायरीया होऊ शकतो. एवढेच नाही तर अश्या प्रकारचे बटाटे नियमित खाण्यामुळे डोकेदुखी किंवा बेशुद्ध होण्याची शक्यता निर्माण होते.

राजमा

राजमा तुमच्या पैकी अनेक लोकांना खाण्यास आवडत असेल. पण तुम्हाला आश्चर्य होईल कि कच्च्या राजमा मध्ये ग्लाईकोप्रोटीन लेक्टिन असते, ज्यामुळे उलटी किंवा इनडाईजेशनची समस्या होण्याची शक्यता असते. जर याचा प्रभाव कमी करायचा असेल तर राजमा नेहमी व्यवस्थित उकळवून (उकडून) खाल्ला पाहिजे.

कोल्ड ड्रिंक

तरुण असो किंवा वयस्कर सर्वांना कोल्ड ड्रिंक जबरदस्त आवडते. यामध्ये साखर आणि फॉस्फोरिक एसिडचे प्रमाण जास्त असते. असे शोधा मध्ये आढळले आहे कि जास्त कोल्ड ड्रिंक पिण्यामुळे हार्ट अटैकची भीती वाढते. सोबतच मोठे आतडे देखील खराब होते.

मैदा

मैदा जास्त खाण्याची वस्तू नाही आहे. मैदा बनवण्याच्या प्रक्रियेत फाइबर निघून जाते. शोधा मध्ये असे आढळले आहे कि जास्त मैदा खाण्यामुळे पोटाच्या समस्या वाढण्याची शक्यता निर्माण होते. मैद्या मध्ये ब्लिचिंग तत्व असतात, जे रक्त पातळ करतात आणि हृदयाचे विकार होण्याची भीती वाढते.

आयोडीन मीठ

शोधा मध्ये असे हि समजले आहे कि यामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. यास जास्त खाण्यामुळे उच्च रक्तदाब होण्याची शक्यता वाढते. एवढेच नाही तर याच्या जास्त सेवनामुळे कैंसर आणि आस्तियोपोरोसिस होण्याची शक्यता वाढते.

जायफळ

शोधा मध्ये हे देखील समजले आहे कि यामध्ये myristicin असते. यामुळेच नेहमी-नेहमी हृदयाची धडधड वाढते. याच्या सेवनामुळे उलटी आणि तोंड कोरडे पडणे यासारखी समस्या होते. एवढेच नाही जास्त खाण्यामुळे ब्रेन पॉवर कमी होते.

फास्टफूड

फास्ट फूड बद्दल तर कदाचित कोणासही काही सांगण्याची गरज नाही. हे आपल्या शरीरासाठी किती खतरनाक आहे, या बद्दल अनेक शोधा मध्ये सिद्ध झालेले आहे. यामध्ये मोनोसोडियम ग्लूटामेट असते, ज्यामुळे ब्रेन पॉवर कमी होते आणि वजन वेगाने वाढते. सोबतच हृद्य रोगाची भीती राहते.

मशरूम

कच्चे मशरूम कधीही खाल्ले नाही पाहिजेत. कारण कच्चे मशरूम मध्ये कार्सिनोजेनिक कंपाउंड असते. यामुळे कैंसरची शक्यता वाढते. हेच कारण आहे कि असे सांगितले जाते कि मशरूम नेहमी व्यवस्थित उकडवून वापरले पाहिजेत.

साखर

शोधा मध्ये साखर हे पांढरे विष आहे असे मानले गेले आहे. यास खाण्यामुळे लिवर मध्ये ग्लाइकोजन चे प्रमाण कमी होते, ज्यामुळे वजन वाढणे, थकवा, माईग्रेन, अस्थमा आणि डायबेटीस ची समस्या वाढू शकते आणि यास जास्त खाण्यामुळे म्हातारपण लवकर येते.


Show More

Related Articles

Back to top button