Peoplerelationship

शुक्राचार्य अनुसार चुकूनही आपल्या या 9 गोष्टी कोणालाही सांगू नयेत, अन्यथा….

आपल्या देशाच्या भूमीवर अनेक ज्ञानी लोक जन्माला येऊन गेले आहेत. यापैकीच एक होते महान विद्वान शुक्राचार्य. शुक्राचार्य एक महान विद्वान होण्याच्या सोबतच एक चांगले नितीकार देखील होते. शुक्राचार्य यांची नीति आजच्या काळात अत्यंत महत्वपूर्ण आहे.

नेहमी लपवून ठेवा या गोष्टी

शुक्राचार्य ने अश्या 9 गोष्टी सांगितल्या आहे ज्यांना नेहमी दुसऱ्या पासून लपवून ठेवल्या पाहिजेत. त्यांचे असे म्हणणे होते की तुमच्या या गोष्टी जर दुसऱ्याला समाजाल्यातर त्यामुळे तुमचे नुकसान होईल.

श्लोक:

आयुर्वित्तं गृहच्छिद्रं मंत्रमैथुनभेषजम्।
दानमानापमानं च नवैतानि सुगोपयेतू।।

शारीरिक संबंध

ही कोणत्याही पती-पत्नीची अत्यंत गुप्त गोष्ट आहे. यागोष्टी जेवढ्या गुप्त राहतील तेवढे चांगले. जेव्हा या गोष्टी दुसऱ्याला समजतात तेव्हा त्या समस्या आणि लज्जे कारण बनतात.

वय

असे बोलले जाते की व्यक्तीने आपल्या वयाच्या बाबतीत प्रत्येका सोबत चर्चा करू नये. यास गुप्त ठेवले पाहिजे. अन्यथा अनेक वेळा तुमचे वय समजल्यावर तुमचा क्षत्रू याचा फायदा घेऊ शकतो.

घरातील गोष्टी

आपल्या मध्ये असे अनेक लोक असतात जे आपल्या घरातील गोष्टी आपल्या मित्र आणि इतर लोकांच्या बरोबर शेयर करतात. पण नंतर त्यांनाच पस्तावावे लागते. यामुळे घरातील लोकांच्या मध्ये मनमुटाव आणि अविश्वास यांची भावना तयार होते. घरातील गोष्टी जर घरातच राहिल्यातर व्यक्तीचे जीवन सुखी राहते.

धन

पैश्यांच्या बाबतीत देखील इतरांना काही सांगू नये. धन ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला नवीन वैरी (दुश्मन) तयार करून देते. त्यामुळे जर अन्य कोणताही व्यक्तीला या बद्दल समजले तर तुमच्यासाठी समस्याच निर्माण होतील.

डॉक्टर

डॉक्टर एक असा व्यक्ती असतो जो कोणत्याही व्यक्ती बद्दल अतिक्षय वैयक्तिक गोष्टी माहीत असलेला असतो. त्यामुळे तुमचे दुश्मन आणि तुमच्यावर जळणारे याचा फायदा घेऊ शकतात. यासाठी आपल्या डॉक्टरची माहीती देखील इतरांच्या पासून लपवून ठेवा.

दान

असे मानले जाते की दान-धर्म गुप्त केले तर जास्त फळ देते. जो व्यक्ती इतर लोकांना आपण किती मोठे आहोत हे दाखवण्यासाठी उघडपणे दान करतो, त्यास दानाचे फळ मिळत नाही आणि त्याचे सर्व पुण्य नष्ट होते.

मंत्र

तुम्ही परमेश्वराला खुश करण्यासाठी ज्या मंत्राचा जप करता, त्याबद्दल कोणालाही सांगू नये. असे मानले जाते की जो व्यक्ती आपली पूजा-पाठ किंवा मंत्र गुप्त ठेवतो त्याला जास्त फळ प्राप्ती होते.

मान-सन्मान

आपल्या मान-सन्मानाचा देखावा कधी नाही केला पाहिजे. असे संकुचित विचारांचे लोक करतात. असे नेहमी केल्यामुळे लोकांना तुमच्या बद्दल चीड निर्माण होईल आणि याचा वाईट परिणाम तुमच्या मान-सन्मानावर पडेल.

अपमान

मान-सन्माना प्रमाणे अपमाना बद्दल देखील कोणाला सांगू नये. दुसऱ्याला या बद्दल सांगितल्यामुळे तुम्हाला नुकसान होते. जेव्हा ही गोष्ट दुसऱ्याला समजते तेव्हा तोही तुमचा सन्मान करणे सोडून देतो.


Show More

Related Articles

Back to top button