अंगठ्या मध्ये चांदीची अंगठी धारण केल्याने बदलते नशीब, शुक्र ग्रह होतो मजबूत

0
98

कुंडली मध्ये शुक्र ग्रह मजबूत नसेल तर त्याचे अशुभ फळ आपल्याला मिळतात आणि आपले कोणतेही कार्य यशस्वी होत नाही. शुक्र ग्रह मजबूत नसल्यामुळे धन हानी, त्वचा विकार, गुप्त रोग, कौटुंबिक जीवनामध्ये समस्याच आणि वैवाहिक जीवनामध्ये बिघाड या सारख्या समस्या होऊ लागतात. त्यामुळे ज्या लोकांच्या कुंडली मध्ये हा ग्रह मजबूत नाही किंवा अशुभ आहे ते लोक हा ग्रह मजबूत करण्यासाठी उपाय करू शकतात. जेणे करून शुक्र ग्रहांमुळे लाभ मिळू शकतील आणि या ग्रहांच्या प्रकोपा पासून वाचता येईल.

शुक्र ग्रह मजबूत असल्यास मिळते सुंदरता

ज्या लोकांच्या कुंडली मध्ये शुक्र ग्रह मजबूत असतो त्यांना सुंदरता मिळते आणि जीवना मध्ये सगळ्या प्रकारचे सुख-सुविधा प्राप्त होतात. शुक्र ग्रह मजबूत असल्यास आपण एक सुखमय जीवन जगता. त्यामुळे आपण शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी खालील उपाय आवश्य करा.

चांदी आणि प्लैटिनमची अंगठी धारण करा

शुक्राचा संबंध आपल्या हाताच्या अंगठ्या सोबत आहे आणि या ग्रहाला मजबूत करण्यासाठी आपण आपल्या अंगठ्या मध्ये अंगठी (छल्ला) धारण करू शकता. अंगठी धारण केल्याने शुक्राचा वाईट प्रभाव होण्यास लागतो. ज्योतिष अनुसार ज्या व्यक्तीच्या कुंडली मध्ये शुक्र ग्रह कमजोर आहे त्या लोकांनी चांदी किंवा प्लैटिनमची अंगठी धारण करावी. या धातूची अंगठी धारण केल्या ने शुक्र प्रभाव आपल्या जीवनावर योग्य होतो आणि हा ग्रह मजबूत होतो. चांदी किंवा प्लैटिनम धारण केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. या दोन्ही धातूच्या अंगठीला अत्यंत शुभ मानले जाते. परंतु यांना योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने धारण केले पाहिजे ज्यामुळे याचे शुभ फलप्राप्त होऊ शकतील.

कसे धारण करावे

चांदी किंवा प्लैटिनमच्या अंगठीला धारण करण्याचा सर्वोत्तम दिवस शुक्रवार आहे. त्यासाठी आपण गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी कच्च्या दुधा मध्ये गंगा जल मिक्स करा आणि नंतर या मिश्रणा मध्ये अंगठी टाका. पूर्ण रात्र अंगठी या मिश्रणा मध्ये ठेवा आणि शुक्रवारी सकाळी स्नान करा आणि अंगठी स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवा. देवघरा मध्ये या अंगठीची पूजा करा. पूजा केल्या नंतर आपण अंगठी धारण करू शकता. आपण अंगठी सूर्योदय पासून ते सकाळी आठ वाजेपर्यंत धारण करा.