Breaking News
Home / करमणूक / मित्राच्या वाईट काळात जो त्याची मदत करतो तोच असतो खरा मित्र

मित्राच्या वाईट काळात जो त्याची मदत करतो तोच असतो खरा मित्र

जीवना मध्ये मैत्रीचे नाते खूपच अनमोल असते आणि हे नाते विश्वास आणि प्रेमाच्या बळावर तयार होते. भगवान श्रीकृष्ण यांचेही आयुष्यात बरेच मित्र होते. पण त्यांचा प्रिय मित्र सुदामा होता. भगवान श्रीकृष्णाने त्यांचे बालपण सुदामाबरोबर घालवले होते आणि त्यांची मैत्री एका आश्रमात झाली होती, जेव्हा भगवान श्री कृष्ण पहिल्यांदा सुदामाला भेटले, तेव्हा दोघांनाही एकमेकांना अजिबात ओळखत नव्हते. पण या दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालवायला सुरुवात केल्यामुळे हे दोघे एकमेकांचे अत्यंत खास मित्र बनले. या दोघांनीही बर्‍याच वेळ एकत्र आश्रमात घालवला आणि शिक्षण घेतले. शिकल्यानंतर हे दोघेही आपल्या घरी परत गेले आणि दोन वर्षे ते एकमेकांना भेटले नाहीत.

श्रीकृष्ण खूप श्रीमंत होते आणि सुदामा खूप गरीब. सुदामा लोकांकडून अन्नाची मागणी करुन आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोषण करत असे. एके दिवशी सुदामाच्या पत्नीने सुदामाला सांगितले की एकदा जाऊन श्री कृष्णाला भेट द्या. जेव्हा श्री कृष्णाला आपल्या गरीबीबद्दल कळेल तेव्हा ते नक्कीच आपल्याला मदत करतील. आपल्या पत्नीच्या शब्दावर विश्वास ठेवून सुदामा श्रीकृष्णास भेटण्यास तयार झाले.

श्रीकृष्णाला भेटायला सुदामा जेव्हा राजवाड्यात गेला, तेव्हा राजवाड्याबाहेर उभे असलेल्या सैनिकांनी सुदामाला राजवाड्यात जाण्यास रोखले. सुदामाने सैनिकांना सांगितले की तो श्री कृष्णाचा मित्र होता. पण सुदामाचे शब्द ऐकून सैनिक हसले. श्री कृष्णाला जेव्हा कळले की सुदामा नावाची व्यक्ती त्याला भेटायला आली आहे. म्हणून श्री कृष्णा धावत सुदामाकडे आले आणि त्यांनी सुदामाला मिठी मारली. श्रीकृष्णाने आपल्या मित्राचे अतिशय चांगल्या प्रकारे स्वागत केले.

श्रीकृष्णाला पाहून सुदामाने त्याला एक प्रश्न विचारला आणिम्हणाले, कृष्णा मी गरीब का राहिलो? सुदामाचे हे ऐकून श्रीकृष्णाने त्यांना आश्रमातील दिवसांची कहाणी आठवण करून दिली आणि सुदामाला म्हणाले, “लक्षात आहे का एकदा आपण जंगलात लाकूड तोडायला जात होतो.” तेव्हा गुरु माँ ने आपल्याला चणे खायला दिले होते आणि म्हणाली होती की आपण हे चणे आपापसांत वाटून घेतले पाहिजेत. पण तेव्हा तू एकट्यानेच चणे खाल्ले होते. ज्यामुळे तुम्ही आज गरीब आहात. लहानपणी केलेल्या या चुकीमुळे तुझ्या सोबत हे सर्व होत आहे. सुदामाला त्यांच्या चुकीची आठवण करून दिल्यावर श्रीकृष्णाने सुदामाची मदत केली आणि सुदामाला अनेक राज्यांचा राजा बनविला.

सुदामा आणि श्रीकृष्ण यांच्या या कथेमधून आपणास हे शिकण्यास मिळते कि एका चांगल्या मित्राने दुसऱ्या सोबत कसा व्यवहार केला पाहिजे आणि एकमेकांची मदत केली पाहिजे.

About V Amit