astrology

शव यात्रा दिसली तर गुपचूप करा हे काम, मनातील सगळ्या मनोकामना पूर्ण होतील

मृत्यू हे जीवनाचे अटळ सत्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मरावे लागतेच. गरुड पुराणा मध्ये सांगितले गेले आहे कि जेव्हा एखाद्या व्यक्तीची मृत्यू जवळ असते तेव्हा यमराज त्यास काही संकेत देतात. यमराजाचे दोन दूत मरणाऱ्या व्यक्ती जवळ येतात आणि फक्त पापी मनुष्यास यमदूतांचे भय वाटते. चांगली कर्मे करणाऱ्या व्यक्तीला मृत्यू समयी आपल्या समोर दिव्य प्रकाश दिसतो आणि त्यास मृत्यूचे भय वाटत नाही. गरुड पुराणा मध्ये सांगितले गेले आहे कि ज्या व्यक्तीची मृत्यू होणार असते ती बोलू शकत नाही. अंतिम समयी व्यक्तीची आवाज बंद होते आणि त्याचा आवाज खरखरायला लागतो. असे वाटते जसे काही त्याचा कोणी गळा  दाबत आहे.

अंतिम समयी परमेश्वरा कडून दिव्यदृष्टी प्राप्त होते आणि तो सगळ्या संसाराला एकरूप समजू लागतो. डोळ्यांनी त्याला काही दिसत नाही. तो अंधळा  होऊन जातो आणि त्याला आपल्या आजूबाजूला बसलेले लोक देखील दिसत नाहीत. त्याच्या सगळ्या इंद्रियांचा नाश होतो. तो जड अवस्थेत येतो म्हणजेच हालचाल करण्यास असमर्थ होतो. यानंतर त्याच्या तोंडातून फेस निघतो आणि लाळ निघते. पापी व्यक्तीचे प्राण खालील मार्गाने निघतात.

शव यात्रा दिसल्यास करावे हे काम

मृत्यू नंतर व्यक्तीची शव यात्रा काढली जाते. शव यात्रेत व्यक्तीच्या मृतदेहाला 4 लोक खांदा देतात आणि त्यास स्मशानात घेऊन जातात जेथे त्याच्यावर दाह-संस्कार केले जातात. अनेक वेळा आपल्याला शव यात्रा नजरेस पडते. शव यात्रा दिसल्यास अनेक लोक हाथ जोडतात आणि मेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतात. शव यात्रा पाहणे तसे तर एक दुःखद घटना असते पण असे बोलले जाते कि शव यात्रा दिसल्यास व्यक्तीने एक काम केले तर त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.

आता तुम्ही विचार करत असाल कि तुम्हाला एखादे कठीण काम करावे लागेल पण असे काही नाही आहे. येथे जे सांगितले गेले आहे ते अगदी सोप्पे आहे आणि यास करण्यासाठी तुम्हाला कोणतीही मेहनत करावी लागणार नाही. खरतर असे मानले जाते कि शव यात्रा निघण्याच्या दरम्यान हात जोडून भगवान शंकराचे स्मरण केले तर शिवशंकर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. त्यामुळे यापुढे जेव्हा तुम्हाला शव यात्रा दिसली तर हात जोडून भगवान शंकराचे स्मरण आवश्य करा आणि मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करा. असे केल्याने आपल्या मनातील मनोकामना पूर्ण होईल आणि मेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळेल. एवढेच नाही तर व्यक्तीच्या वाईट काळात येणाऱ्या सगळ्या समस्या दूर राहतात.

Tags
Show More

Related Articles

Back to top button