DTC च्या बसमध्ये विनोद यांनी शीला दीक्षित यांना केला होता प्रपोज, अशी सुरु झालेली दिल्लीच्या फेवरेट सीएम ची लव्ह स्टोरी

दिल्लीची फेवरेट एंड पॉप्युलर मुख्यमंत्री म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या शीला दीक्षित यांचे शनिवारी निधन झाले. शीला दीक्षित यांनी एक दशक दिल्लीला एक दशक सुंदर बनवण्यासाठी काम केले, ज्यामुळे त्यांनी लोकांच्या मनामध्ये राज्य केले. दिल्लीच्या लोकांसाठी शीला दीक्षित ग्रँड मदर सारखी होती. एवढेच नाही, दिल्ली आधुनिक बनवण्यामध्ये शीला दीक्षित यांचे मोठे योगदान राहले आहे. आपण शीला दीक्षित यांच्या राजकीय करियर बद्दल तर जाणूनच आहोत, पण आज आम्ही तुम्हाला त्यांच्या लव्ह लाइफ बद्दल सांगत आहोत.

काँग्रेस लीडर शीला दीक्षित 1998 ते 2013 पर्यंत दिल्लीच्या तीन वेळा मुख्यमंत्री होत्या, त्यादरम्यान त्यांनी दिल्लीची प्रगती करण्याचा प्रयत्न केला. शीला दीक्षित यांनी दिल्लीला सजवले आहे आणि त्यांना यागोष्टीची कधीच काळजी वाटली नाही कि केंद्रा मध्ये कोणाचे सरकार आहे कारण त्यांना फक्त आपल्या कामावर विश्वास होता, ज्यामुळे त्यांनी दिल्लीला आज ग्रीन दिल्ली बनवली आहे. असो त्यांच्या राजकीय जीवनाबद्दल थोडक्यात माहिती घेतल्या नंतर आपण आता शीला दीक्षित यांच्या लव्ह स्टोरी बद्दल माहिती घेऊ.

शिक्षणा दरम्यान विनोद सोबत झाली होती ओळख

दिल्लीला जवळून जाणून असलेली शीला दीक्षित यांचे शिक्षण दिल्ली विश्वविद्यालय मध्ये झाले. शीला दीक्षित यांची ओळख शिक्षण घेत असतानाच विनोद दीक्षित यांच्या सोबत झाली होती, जे काँग्रेसचे एक मोठे नेता उमाशंकर यांचे एकुलते एक पुत्र होते. विनोद दीक्षित आणि शीला यांची ओळख हळूहळू वाढू लागली आणि नंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. परंतु, या दरम्यान दोघांच्या प्रपोजची गोष्ट मनोरंजक आहे. खरंतर, शीला दीक्षित विनोद यांना पसंत करत नव्हत्या, पण नंतर दोघांची मैत्री झाली.

प्रपोज करण्यासाठी बस मध्ये फिरले होते दोघेही

मीडियाला दिलेल्या एका इंटरव्यू मध्ये शीला दीक्षित यांनी सांगितले कि जेव्हा पहिल्यांदा विनोद मला त्यांच्या मनातील भावना सांगत होते, तेव्हा आम्ही दोघांनीं एकत्र एका डीटीसी बस मध्ये एक तास प्रवास केला होता. त्या दिवशी विनोद ने मोठ्या प्रवासा नंतर मला सांगितले होते कि मी आपल्या आईला सांगणार आहे कि ज्यामुलीला मी पसंत करतो ती तू आहेस, त्यानंतरच विनोदने मला लग्नासाठी प्रपोज केले होते. शीला दीक्षित यांनी सांगितले कि ती बस डीटीसीची 10 नंबर होती. जी चांदणी चौक मधून जात होती.

कौटूंबिक विरोधाचा सामना करावा लागला होता

शीला दीक्षित यांनी आपल्या लव्ह स्टोरी बद्दल सांगताना म्हणाल्या कि जेव्हा विनोदच्या कुटुंबाला माझ्या बद्दल समजले, तेव्हा मोठा विवाद झाला, शीला दीक्षित यांनी सांगितले कि त्यानंतर विनोदाच्या घरच्यांनी विरोध केला, पण शेवटी आम्ही आमच्या कुटुंबाला लग्नासाठी परवानगी मिळवली. शीला दीक्षित आणि विनोद हे एकाच कॉलेज मध्ये शिक्षण घेत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here