People

महिलेने सांगितले पहिले तो पैसे मागत होता…

अमेरिकेतील मिनेसोटा स्टेट मध्ये कैफे चालवणाऱ्या मुली सोबत एक अशी घटना झाली जी तिच्यासाठी धक्कादायक होती. ज्यानंतर तिला फार धक्का बसला. एवढा किती तिने संपूर्ण घटना आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेयर केली. या घटनेनुसार एक बेघर व्यक्ती तिच्या जवळ आला आणि तिच्याकडे काही पैसे मागू लागला. महिलेने त्याला पैसे तर दिले नाही पण त्याएवजी त्याला कामावर ठेवले. दोन आठवड्या नंतर जेव्हा महिलेने त्याला पैसे देण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीने असे काही केले कि महिला चकित झाली.

महिलेने नव्हते दिले पैसे

हि घटना मार्च 2016 ची आहे, जेव्हा एक दिवस मिनियापोलिस शहरात राहणाऱ्या सेसिया अबिगेल आपल्या कैफे मध्ये बसली होती. तेव्हा तिच्याकडे मार्कस नावाचा एक बेघर व्यक्ती आला आणि तिच्याकडे काही पैसे मागू लागला.

सेसियाने त्यास पैसे देण्यास नकार देताना म्हंटले, ‘तुला माहित आहे का येथे मला काहीही फ्री मध्ये नाही मिळत.’ त्याच सोबत ती पुढे म्हणाली, ‘तू काही काम का नाही करत?’

त्या महिलेचे बोलणे ऐकून व्यक्ती म्हणाला, ‘काम तर मला करण्याची इच्छा आहे. त्यासाठी मी भरपूर प्रयत्न देखील केले, पण क्रिमिनल (अपराधिक) रेकॉर्डमुळे मला कोणीही काम देण्यास तयार होत नाही आणि त्यामुळेच मला रस्त्यावर भटकत जीवन जगावे लागत आहे.’

त्याचे हे बोलणे मनाला लागले

मार्कसची स्टोरी सेसियाच्या मनाला लागली आणि तिने त्वरित त्या बेघर व्यक्तीला आपल्याकडे नोकरीला ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु तिने अत्यंत मेहनतीने आपला कैफे बनवला होता, तश्यात तिने मार्कसला नोकरी देणे मोठी रिस्क होती. पण तरीही तिने हि रिस्क घेतली.

कामाच्या पहिल्या दिवशी जेव्हा मार्कस कैफेच्या आतमध्ये गेला तेव्हा सेसियाला थोडा त्रास झाला. खरतर, तिच्याकडे काम भरपूर होते आणि तिला एका वर्करची गरज पण होती. परंतु तिची कमाई एवढी जास्त नव्हती कि सेसिया त्याला अफोर्ड करू शकेल.

फेसबुकवर लिहिली पूर्ण स्टोरी : सेसियाने पूर्ण घटना फेसबुकवर पोस्ट मध्ये शेयर केली

‘त्यादिवशी माझ्याकडे स्टाफची कमी होती, त्यामुळे मी त्या व्यक्तीला विचारले, तुला काम करायचे आहे का? माझ्याकडे तुझ्यासाठी एक नोकरी आहे. माझे बोलणे ऐकून त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि त्याचे हास्य पाहून मलाही चांगले वाटले.’ तो म्हणाला, ‘मी पोट भरण्यासाठी काहीही करू शकतो.’  या पोस्टमध्ये सेसियाने सांगितले, ‘त्याला काम करत असताना जवळपास दोन आठवडे झाले, आणि या दरम्यान तो आपल्या दोन तासांच्या शिफ्टसाठी वेळेवर येत आहे… तो कचरा साफ करणे, भांडी घासणे यासाठी मदत करतो.’

‘एकदा जेव्हा मी त्याला त्याच्या कामाचे पैसे दिले, तर मी दिलेल्या पैश्यांनी त्याने माझ्याच रेस्टोरेंट मध्ये जेवण खरेदी केले. जेवण घेतल्या नंतर त्याने मला पेमेंट करण्याचा निर्णय घेतला. कारण त्याला यामुळे भरपूर आनंद मिळाला. खरतर नव्या नोकरीमुळे मार्कसला नवीन आत्मविश्वास मिळाला होता आणि तो फारच बदलला होता.’

सेसिया म्हणते, ‘नेहमी कोणासाठी तरी काही चांगले करत राहावे. कोणाही बद्दल कधी वाईट विचार करू नये कारण तो बेघर आहे आणि त्याच्याकडे पैसे नाहीत. कारण आपल्याला त्याची परस्थिती माहित नाही. असू शकते कि त्याला फक्त एका संधीची आवश्यकता आहे. परमेश्वराने जर आपल्याला काही जास्त दिले आहे तर आपण त्यास दुसऱ्या सोबत का शेयर नाही करू शकत.’


Show More

Related Articles

Back to top button