astrology

शास्त्राच्या अनुसार या सवयींमुळे घटते आयुष्य, विशेषतः शनिवारी चुकूनही करू नये या चुका

सध्याच्या या विज्ञान युगामध्ये भलेही आपण धर्मग्रंथातील ज्ञान विसरत चाललो असू पण वास्तवता ते आजही आपल्यासाठी तेवढेच महत्वाचे आणि हितकारी आहेत जेवढे ते प्राचीन काळी होते. कदाचित सायन्स कडे आपल्या बहुतेक सर्व समस्यांचे समाधान आहे, पण धर्म ग्रंथ आणि शास्त्र आपल्याला मार्ग सांगतात ज्यांचे पालन केल्याने समस्या पासून वाचले जाऊ शकते. आज टेक्नीकली आपण दिवसेंदिवस आपण पुढे जात आहोत पण वास्तवात माणसाचे सरासरी आयुष्य कमी होत आहे ज्याचे मोठे कारण जीवनशैली आणि आपल्या सवयी आहेत. तर धर्म ग्रंथा मध्ये मनुष्याच्या अश्या सवयी बद्दल सावध केले गेले आहे. आज येथे काही अश्याच सवयी बद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

माणसाच्या अश्या सवयी बद्दल महाभारत या ग्रंथा मध्ये सविस्तर सांगितले आहे ज्यांचा मनुष्य जीवनावर नकारात्मक परिणाम पडतो.

महाभारता अनुसार जे लोक धर्म नितींचे पालन करत नाहीत आणि त्यांचे उल्लंघन करतात त्यांचे आयुष्य कमी होत जाते. तर जे धार्मिक मर्यादांचे पालन करतात आणि सत्याची साथ देतात असे मनुष्य 100 वर्ष जगतात.

व्यक्तीच्या व्यवहारा सोबतच त्याच्या सवयी देखील त्याच्या आयु वर प्रभाव टाकतात. जसे जो व्यक्ती नेहमी नखे चावतो किंवा नेहमी घाणी मध्ये राहतो त्याच्या आयुष्यात कमी होते.

तसेच महाभारताच्या अनुसार अभ्यास करताना कधीही काहीही खाऊ नये, कारण यामुळे यमराज नाराज होऊ शकतात आणि व्यक्ती लवकर काळाचा भागी होऊ शकतो.

शास्त्रा अनुसार आकाशात वर आलेल्या सूर्या कडे पाहण्यामुळे देखील जीवन कमी होते आणि असे करणारा व्यक्ती शीघ्र मृत्यूस प्राप्त होऊ शकतो.

तर भोजन करण्यासंबंधी एक मान्यता हि पण आहे कि भोजन करताना मध्येच उठले नाही पाहिजे आणि जर तुम्ही उठले तर पुन्हा उष्ट्या हाताने जेवण सुरु नाही केले पाहिजे, असे केल्याने आयुष्य कमी होते.

तसेच शास्त्रा मध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपणे चुकीचे मानले गेले आहे. शास्त्रा अनुसार असे करणे सरळ यमराजाला आमंत्रण देणे आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपल्यामुळे शरीर आजारांनी घेरले जाते आणि आयुष्य कमी होते.

वास्तूशास्त्रा मध्ये देखील अश्या अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत जसे मुख्य दरवाजाच्या समोर पाय करून कधी झोपले नाही पाहिजे. असे केल्यामुळे यमराज नाराज होतात.


Show More

Related Articles

Back to top button