Connect with us

या 5 संकेतामुळे जाणून घ्या शरीरा मध्ये कोणत्या विटामिनची कमी होत आहे

Food

या 5 संकेतामुळे जाणून घ्या शरीरा मध्ये कोणत्या विटामिनची कमी होत आहे

निसर्गाने मानवाची निर्मिती केली त्यासाठी अनेक प्रक्रिया देखील बनवल्या ज्यामुळे शरीरामध्ये होणारे बदलाव आणि अनेक प्रकारच्या समस्यांचे संकेत देखील मिळतात. जर शरीरा मध्ये कोणत्याही विटामिन किंवा मिनरल्सची कमी झाली तर याचे संकेत मिळतात. आज आपण पाहू आपले शरीर कोणत्या विटामिनची कमी झाल्यावर काय संकेत देऊ शकते.

शरीर आपल्याला कोणत्या विटामिनची कमी झालेली आहे याबद्दल काही संकेत देते. आपल्या शरीरात कोणत्या विटामिनची कमी झालेली आहे किंवा होत आहे आणि त्यासाठी आपल्याला काय केले पाहिजे. कोणत्या विटामिनच्या कमीमुळे आपल्याला कोणत्या समस्या होऊ शकतात हे सगळे आज आपण येथे पाहू. ज्यामुळे आपल्याला शरीराकडून मिळणाऱ्या संकेतामुळे सावध होता येईल.

विटामिनची कमी झाल्यावर शरीर देते हे संकेत

जर आपल्या वाटत असेल कि आपल्या ओठांचे कोपरे फाटत आहे किंवा त्यामध्ये जास्त कोरडेपणा आहे तर आयरन, जिंक आणि विटामिन B12 ची कमीमुळे ओठांचे कोपरे फाटू शकतात. ही कमी दूर करण्यासाठी आपल्या रोजच्या डाइट मध्ये अंडे, शिमला मिरची, पत्ताकोबी, आणि शेंगदाणे समाविष्ट करू शकता.

चेहऱ्यावर पिंपल्स होणे म्हणजे शरीरामध्ये विटामिन ए आणि विटामिन सी यांची कमी असू शकते. तुमच्या माहितीसाठी यांच्या कमीमुळे चेहऱ्याची स्कीन खराब होऊ शकते. यासाठी उकडलेले अंडे आणि पत्ताकोबी आपल्या डाइट मध्ये समाविष्ट करु शकता.

केसांचे गळणे हे देखील एक लक्षण असू शकते हे लक्षण तुमच्या शरीरामध्ये विटामिन B7 जिंक आणि प्रोटीनची कमी असू शकते. ज्यामुळे केस गळू शकतात आणि यांची चमक कमी जाऊ शकते. यासाठी तुम्ही अंडे, डाळ, बदाम, चने आणि भोपळ्याच्या बिया यांचे सेवन करू शकता.

जर तुम्हाला असे वाटत असेल कि तुमचे वजन विना कारण जास्तच कमी होत आहे तर समजावे कि विटामिन डी शरीरामध्ये कमी झाल्याची शक्यता आहे. अश्या स्थितीत मच्छी, अंडे आणि मशरूम सेवन केल्यामुळे दूर होऊ शकते.

जर अचानक काम करताना किंवा बसल्या बसल्या आपले हात किंवा पाय सुन्न पडत असतील तर हे विटामिन b6, b9, b12  यांच्या कमीमुळे नसांवर प्रभाव पडू शकतो. अश्या स्थितीत पालक, अंडे आणि बीट आपल्या डाइट मध्ये समाविष्ट करावे.

अत्यंत महत्वाचे : वरील संकेत मिळण्याच्या मागे इतर दुसरे कारणे देखील असू शकतात तरी त्यासाठी आपल्या डॉक्टरचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. ते तुम्हाला अगदी जवळून पाहतात आणि तुमची प्रकृती व्यवस्थित जाणून असतात त्यामुळे त्यांचा सल्ला आवश्य घ्यावा. केवळ ऑनलाईन माहितीच्या आधारावर कोणतेही उपचार करू नयेत.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top